प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र नाशिक द्वारा 16.11.2019 ते 30.11.2019 या कालावधीत स्वच्छता पाखवाडा साजरा केल्या बाबत
16.11.2019 ते 30.11.2019 या कालावधीत प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे, भारतीय डाक विभाग, नवी दिली यांच्या निर्देशानुसार “स्वच्छता पाखवाडा” साजरा करण्यात आला. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नाशिक चे प्रमुख श्री डी.बी. वसदानी यांच्या नेतृत्वात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पाखवाडा खर्याे भावनेने साजरा केला.
दी. 16.11.2019 रोजी स्वछतेचीची शपथ घेउन सुरवात करण्यात आली त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचा परिसर व वसतिगृहांची स्वच्छता, वृक्षारोपण, स्वच्छता फेरी, पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापन विषयक कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले, प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षनार्थासाथी “स्वच्छ भारत मिशन” या विषयावर निबंध स्पर्धेचे व “स्वछता अभियान” या विषयावर “प्रश्नावली” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

फ्रावाशी अकादमी व श्री. दिलीपसिंग बेनीवाल यांच्या द्वारे “वेस्ट मैनेजमेंट” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. स्वच्छता पखवाड्याचा समारोप आज दी.३०.११.२०१९ करण्यात आला त्यात पुरस्कार प्राप्त प्रशिक्षनार्थाचा सन्मान करण्यात. सध्याच्या स्थितीला राजस्थान आणि उत्तर प्रदेश सर्कलमधील प्रशिक्षणार्थी नाशिक येथे प्रशिक्षण घेत आहेत त्यांचे योगदान या पंधरवाड्यात लाभले ही महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी ही अभिमानाची बाब आहे की.






