प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ८ डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताहाचे आयोजन

Dec 2, 2019

मुंबई : माता व बालमृत्यू दरात घट होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ राज्यातील 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांनी घेतला असून त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता दि. 8 डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.     

अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी जावे लागते. प्रसुतीनंतरही त्यांना मजुरी करावी लागते. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेता दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांसाठी  प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेला तीन टप्प्यांमध्ये एकूण 5 हजार रुपयांची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली जाते.राज्यात आतापर्यंत 12 लाख 87 हजार 84 एवढे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरिता आजपासून ते दि. 8 डिसेंबर 2019 पर्यंत विशेष सप्ताह आयोजित केला असून आरोग्यदायी राष्ट्र उभारण्याच्या दिशेने ‘सुरक्षित जननी, विकसित धारिणी’ हे  ब्रीद वाक्य घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक ते कागदपत्र देऊन नोंदणी करायची आहे, असे आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले.लाभार्थीचे तसेच तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक अथवा टपाल कार्यालयातील खात्याचा तपशील, माता बालसंगोपन कार्ड आणि बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News