लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक जाहीर

Dec 3, 2019

नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यसेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा समावेश आहे.

आयोगाने निश्चित  केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा 5 एप्रिल 2020 तर मुख्य परीक्षा 8, 9  व 10 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 1 मार्च तर मुख्य परीक्षा 14 जून 2020 रोजी घेतली जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 15 मार्च तर मुख्य परीक्षा 12 जुलै 2020 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 10 मे 2020 तर मुख्य परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी असेल. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत 5 जुलै 2020 रोजी पूर्व परीक्षा तर 1 नोव्हेंबर 2020 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा 3 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा 6 सप्टेंबर,2020 पोलीस उप निरीक्षक पद मुख्य परीक्षा 13 सप्टेंबर 2020 राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा 27 सप्टेंबर 2020 तर सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 4 ऑक्टोबर 2020  रोजी घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 17 मे 2020 रोजी होणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 18 ऑक्टोबर 2020 रोजी होईल. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 7 जून 2020 रोजी होणार आहे. संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा 29 नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा 6 डिसेंबर 2020  दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क मुख्य परीक्षा 13 डिसेंबर 2020 रोजी तर कर सहायक मुख्य परीक्षा 20 डिसेंबर 2020 रोजी घेतली जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News