शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार

Dec 4, 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.

दि. १० डिसेंबर  ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर, तालुकाध्यक्ष व सेलच्या जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार बोलत होते.  दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगळ्या स्वरुपात कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. शेतातील पिक वाहून गेल्याने जमिनी देखील निकामी झाल्या आहेत. शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतो आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग मोठया आशेने खा. शरद पवार यांच्याकडे बघतो आहे. शेतकरी कुटुंबियांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील सर्व कार्यकर्ते मिळून मोठा आर्थिक निधी उभा करणार आहेत. हा जमा झालेला एकूण निधी दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

यावेळी राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अभिनंदनाचा तसेच या मंत्री मंडळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांची कॅबीनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.    

यावेळी बागलाण विधानसभा अध्यक्ष माजी आमदार संजय चव्हाण, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, तालुकाध्यक्ष सर्वश्री डॉ. सयाजीराव गायकवाड, राजेंद्र डोखळे, संदीप पवार, राजेंद्र सोनवणे, जितेंद्र पगार, ज्ञानेश्वर शेवाळे, जितेंद्र आहेर, शैलेश सूर्यवंशी, विजय पाटील, नरेश देशमुख, बाळकाका कलंत्री, दामू राऊत, राजू पवार, तौसिफ मनियार, निलिमा काळे आदी उपस्थित होते.

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News