राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

Dec 6, 2019

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबडेकर यांच्या प्रतिकृतीस नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे व सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
महामानव डॉ.बाबसाहेब आंबडेकर यांच्या जीवनकार्याविषयी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले कि, आधुनिक भारताच्या इतिहासातले अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबसाहेब आंबडेकर. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा बाबासाहेबांचा निश्चय होता. दलित, वंचित, स्त्रियांचे कैवारी असलेले बाबासाहेब राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांना भेदभाव रहित शिक्षण अपेक्षित होते. त्यांना नेहमी वाटायचे दलितांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. भारत स्वातंत्र्य होण्याआधी जो व्यक्ती टॅक्स भरेल त्यालाच मतदानाचा अधिकार होता. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला म्हणूनच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्याची सुरवात आम्ही भारताचे लोक अशी केली यातून त्यांची वैचारिक शक्ती कशी होती हे कळते. जगात सर्वात मोठी व महत्वाची अशी घटना त्यांनी लिहिली. या घटनेतून सर्वसामान्य जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, मनपा गटनेते गजानन शेलार, अशोक सावंत, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले.
याप्रसंगी अनिता भामरे, अंबादास खैरे, सुषमा पगारे, सुरेश आव्हाड, पद्माकर पाटील, अनिल जोंधळे, सुरेखा निमसे, शंकर मोकळ, मनोहर बोराडे, जीवन रायते, चेतन कासव, बालम पटेल, भारत जाधव, योगेश दिवे, राजेंद्र शेळके, मिलिंद पगारे, महेश भामरे, रंजना गांगुर्डे, मुकेश शेवाळे, नवराज रामराजे, डॉ.संदीप चव्हाण, राजाभाऊ जाधव, गौतम पगारे, मोतीराम पिंगळे, दिलीप दोंदे, संजय पोरजे, निवृत्ती पोरजे, प्रकाश राऊत, बाळासाहेब जाधव, सोपान कडलग, पंडित खाडे, रवींद्र जाधव, निखील भागवत, रोहित पाटील, विनोद डोके, बोधी रुपवते, संतोष गोसावी, संजीवनी गायकवाड, अर्चना श्रीवास्तव, आदिसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News