नाशिक – नाशिक केंब्रिज प्रायमरी स्कुल येथे नुकतेच कला या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात चिमुकल्यांनी रंग, संगीत, बारा बलुतेदार, घरातील विज्ञान, आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध व्यवसायातील व्यक्ती यांचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण घेतले. यासाठी विविध मॉडेल्सचे हि त्यांनी सादरीकरण केले. या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी भेटी दिल्या. प्रदर्शनाचे उदघाटन विशाखा समितीच्या गौरी रहाळकर व प्रज्ञा बापट यांनी केले. याप्रसंगी शाळेचे विश्वत राहुल रामचंद्रन उपस्थित होते.





