राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, पर्यावरण विषयक व क्रीडा कार्यक्रम घेऊन दि.१० पासून नाशिक शहरात स्वाभिमान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.
सदर कार्यक्रम पुढील प्रमाणे दि.१० रोजी पंचक येथील शाळेत विद्यार्थिनीना आरोग्य विषयक मार्गदर्शन, स्वरक्षणासाठी कायदेविषयक ज्ञान व शालेय मुलींना सॅनटरी नॅपकिनचे वाटपाच कार्यक्रम करण्यात येत आहे. दि. ११ म्हसरूळ येथे ८० व्यक्तींचे ८० लाखांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे. दि.१२ आकाशवाणी केंद्र येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, वॉक फॉर हेल्थ, सातपूर विभागातील सिग्नलवर वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती, नाशिकरोड सुभाष रोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, बिटको रुग्णालयात फळ वाटप, कामगार कल्याण केंद्र देवळाली गाव येथील अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप, सिन्नर फाटा महापालिकेतील शाळेत मिठाई वाटप, बिटको चौकात १०० किलो लाडू वाटप, पवननगर येथे मोफत आरोग्य शिबीर, पेठरोड वरील नवनाथ नगर समाज मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, दुधबाजार येथे महिला सक्षमीकरणावर व्याख्यान, सातपूर कॉलनीमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, हनुमान वाडी येथे ८० वयोवृद्ध व्यक्तींना काठी वाटप, दि.१३ रोकडोबावाडी परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर, अंगणवाडीतील दैनदिन वस्तूची भेट, राजराजेश्वरी कार्यालय परिसरात अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप, सामनगाव रोड परिसरात वृद्धांना नित्य उपयोगी वस्तूंचे वाटप, सिन्नर फाटा येथील आदर्श विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संतुलन व्याख्यान, राजराजेश्वरी चौक येथील अमृत उद्यानात व्यायाम का करावा व आहार मार्गदर्शन शिबीर, वडनेर गेट परिसरात नेत्र तपासणी शिबीर व चष्मा वाटप, दसक मधील राजीव गांधी विद्यालयात मोफत शालेय वस्तूंचे वाटप, प्रभाग क्र १७ मध्ये स्वच्छता मोहीम व औषध फवारणी, जेतवन नगर येथील अनाथ आश्रमात ऊबदार कपडे वाटप, तवलीफाटा येथील अनाथ आश्रमात अन्नदान असे विविध सामाजिक, आरोग्य विषयक,पर्यावरण विषयक व क्रीडा कार्यक्रम नाशिक शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मा.आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, निवृत्ती अरिंगळे, गजानन शेलार, अशोक सावंत, मधुकर मौले, पद्माकर पाटील सर्व विभाग अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व फ्रंटल सेल अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले आहे.





