नाशिक : नाशिकमधील नांदगाव तहसील येथील सोयगावचे माजी पोलिस पाटील किसन सानप यांचे दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्याउपरोंत त्यांच्या परिवाराने सानप यांच्या अस्थींचे विसर्जन नदी पत्रात न करता यांच्या स्वत:च्या शेतात करुन त्याजागी वृक्षारोपण करुन सर्वांना पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला आहे.
सानप यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 11 डिसेंबर 19 रोजी त्यांचे राहते गाव सोयगाव येथे पार पडला.वडीलांच्या निधनानंतर अस्थी विर्सजन नदीत केल्याने प्रदूषण होते हे जाण ठेवून त्यांचे मुले माजी सरपंच नंदू सानप तसेच विस्तार अधिकारी श्रीधर सानप यांनी वडीलांच्या अस्थी शेतात खड़डा करुन त्यात टाकण्याचा हा निर्णय घेतला.या वेळी आमदार सुहास कांदे, ह.भ.प आनंद महाराज यांच्या हस्ते सानप यांच्या वडिलांच्या अस्थींचे विसर्जन करुन त्या जागी वृक्षारोपण केले.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





