नवीन तंत्रज्ञान माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी भूलतज्ञांची विभागीय कार्यशाळा 14 व 15 डिसेंबर रोजी

Dec 12, 2019

नाशिक – भूलतज्ञांची राष्ट्रीय संघटना इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिओलॉजिस्टच्या नाशिक शाखेतर्फे येत्या 14 व 15 डिसेंबर रोजी विभागीय कार्यशाळा व सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा डॉ.सुनिता संकलेचा व सचिव डॉ. श्रीकांत उपासनी यांनी दिली. अशा प्रकारची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच कार्यशाळा आहे.
      शस्त्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका असलेल्या भूलतज्ञांच्या क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान आले असून याबाबतच्या माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी अशा कार्यशाळा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.संस्थेचे देशभरात  20000 हून अधिक सभासद असून नाशिकमध्ये 160 सदस्य आहेत. नाशिकच्या शाखेस भरीव कामगिरीमुळे ‘भूलतज्ञांची उत्कृष्ट शाखा’ म्हणून राज्यस्तरावर प्रथम तर राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांकाने यावर्षी गौरविण्यात आले आहे.जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम संस्थेद्वारे राबविण्यात येत असून भूलशास्त्र-समज व गैरसमज,जीवन संजीवनी या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.या कार्यक्रमांमधून भूलेविषयीची माहिती,संभाव्य धोके,घ्यावयाची काळजी,अचानक हृदयक्रिया बंद पडल्यानंतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत देण्यात येणारा उपचार या बाबतची माहिती देण्यात येते.
  14 व 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यशाळेसाठी अनेक नामांकित तज्ञ येणार असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूलतज्ञ कोईम्बतूरचे डॉ.जे.बालावेंकट व त्यांचे सहकारी ‘रिजनल नर्व ब्लॉक्स’ या भूलतंत्राचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.याशिवाय अनेक महत्वाच्या विषयांवर कार्यशाळेत उहापोह होणार आहे.सदर कार्यशाळा ही हॉटेल एस एस के सॉलीटीयर व वेदांत हॉस्पिटल येथे होणार असून कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ.गीता तोरणे,डॉ.महेंद्र गुप्ता,डॉ.जयश्री साळी,डॉ.तुषार नेमाडे तसेच सभासद कार्यरत आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News