क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती व पुण्यतिथी वंजारी समाज क्रांतिसेना व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने अभिवादन

Dec 13, 2019

दिनांक १३ डिसेंबर क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती व १४ डिसेंबर ही पुण्यतिथी संयुक्तरीत्या वंजारी समाज क्रांतिसेना व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने १३ डिसेंबर रोजी नेहरुगार्डन,शालिमार येथील पुतळ्यास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व म.न.पा.चे गटनेते गजानन शेलार यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंजारी समाज क्रांतिसेनेचे अध्यक्ष बाजीराव घुगे सर यांनी केले.
“क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे कार्य कुणाही एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समावेशक असे होते.तळागाळातील लोकांचे अश्रु पुसण्याचे काम क्रांतिवीरांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती घरोघरी सर्वसमाजाने करायला हवी.”असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॅांग्रेस चे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले. तर क्रांतिवीरांच्या कार्याची माहिती सांगून त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे असे मत गटनेते गजानन नाना शेलार यांनी व्यक्त केले.
यावेळी अॅड.सुरेश आव्हाड यांनी “ क्रांतिवीर वसंतराव नाईक गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन स्वातंत्रय लढ्यात सक्रिय सहभाग घेतला असहकार आंदोलन, सायमन कमिशन, मिठाचा सत्याग्रह, भुमिगत चळवळी मधे ही त्यांचा मोलाचा वाटा होता, शिक्षण व रोजगारावर भर देऊन सर्वसामान्यांच्या जिवनवाटा प्रकाशमान व गतिमान करण्याच काम क्रांतिवीरांनी केले”. असे मत मांडून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, म.न.पा.गटनेते गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी कॅां.ओ.बी.सी.सेल चे अध्यक्ष अॅड.सुरेश आव्हाड, बाजीराव घुगे सर, पंढरिनाथ दादा काकड, कॅांग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड, प्रा.रमाकांत कराड, हाजि मोहिय्योद्दिन शेख, शशिकांत ओतारी, दिनेश नागरे, रामदास बोडके, मोहन चकोर, मारुती काळे, शिवनाथ डोंगरे, शामसिंग परदेशी, प्रमोद मंडलिक, भाउलाल सानप, रवींद्र सोसे, पोपटराव दराडे, नंदकिशोर कांगणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News