हिमालय बेबी केअर तर्फे डॉक्टर्स आणि मातांसाठी संभाषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन

Dec 17, 2019

नाशिक,१७ डिसेंबर २०१९- हिमालय बेबी केअर या भारतातील आघाडीच्या बेबीकेअर ब्रॅन्ड तर्फे नाशिक येथे “माय बेबी अँड  मी” या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मातांना लहान बाळांचे लसीकरण, त्यांची आरोग्य तपासणी तसेच बाळंतीणींची काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली.  बाळांच्या आरोग्याची माहिती तसेच विकासाची काळजी या संदर्भात माहिती देण्यासाठी हिमालय तर्फे शहरांतील डॉक्टरांची मदत घेण्यात आली होती तसेच त्यांच्या बरोबर संभाषणात्मक संवाद साधण्याची संधी मिळाली. 

“पालकांना नेहमीच बाळांचे आरोग्य, झोपण्याच्या सवयी, मसाज आणि साधारणत: बाळांची काळजी कशी घ्यावी याविषयी अनेक शंका असतात.  “माय बेबी अँड मी” या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मातांना डॉक्टरांबरोबर चर्चा करण्याबरोबरच अन्य मातां बरोबर चर्चा करून त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्या विषयीच्या समस्यां विषयी माहिती मिळवण्यासाठी मंच उपलब्ध करून देत आहोत.  “ माय बेबी अँड मी” च्या माध्यमातून आम्ही मातांना शहरांतील प्रतिथयश डॉक्टरांबरोबर चर्चा करून उपाय व विश्वसनीय गोष्टी समजण्याची संधी देत आहोत.” असे ‍हिमालय ड्रग कंपनी च्या हिमालय फॉर मॉम्स आणि हिमालय बेबी केअर चे बिझनेस हेड श्री चक्रवर्ती यांनी सांगितले.    

या कार्यक्रमाला ६० हून अधिक माता उपस्थित होत्या. त्यांना स्त्रीरोग तज्ञ डॉ गायत्री सांगळे, बालरोग तज्ञ डॉ धनंजय सांगळे आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. अपर्णा सिंग यांनी मार्गदर्शन केले.

आपले मत व्यक्त करतांना डॉ. धनंजय सांगळे यांनी सांगितले “ नवजात बाळांसाठी नियमित आरोग्य तपासणी करणे खूपच गरजेचे असते.  अतिशय गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे खूपच महत्त्वाचे असते. “माय बेबी अँड मी” मुळे जन्मानंतरची बाळाची काळजी, बाळंतपणानंतरचे  कुटूंब नियोजन आणि स्तनपान यांसारख्या गोष्टीं बद्दल चर्चा करण्याची संधी मिळते.”

“ बाळंतपणाच्या म्हणजेच बाळाचा जन्म झाल्या पासून २८  दिवसांचा कालावधी हा माता आणि बाळ या दोघांसाठी महत्त्वपूर्ण असतो आणि यांत मोठा धोका असतो.  फळे, भाज्या आणि डाळींचा आहारात समावेश करणे मातेच्या आरोग्यासाठी चांगले असते कारण ती स्तनदा माता असते.  योग्य प्रमाणात अन्न सेवन केल्याने माता कार्यरत राहून बाळाची काळजी नीट घेऊ शकते त्याचबरोबर प्रतिकारशक्ती ही वाढीस लागण्यास मदत होते.” असे डॉ. गायत्री सांगळे यांनी सांगितले.    

संभाषणात्मक अशा कार्यक्रमाबरोबरच  बालकांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे ही यावेळी आयोजन हिमालय बेबी केअर तर्फे करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मातांना बाळंतपणातील दुखण्यांचे व्यवस्थापन आणि बाळाला मसाज करण्याची पध्दत तसेच माता व बालकाच्या आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.  

“माय बेबी अँड  मी” हा हिमालय बेबी केअर तर्फे आयोजित करण्यात येणारा देशव्यापी उपक्रम असून गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन हे औरंगाबाद, अहमदाबाद, आगरा, अमृतसर, बंगलोर, दावणगिरी, हसन, चंदिगढ, लखनौ, लुधियाना, भोपाळ, डेहरादून, गाझियाबाद, इंदूर, जयपूर, उदयपूर, कोची, कोलकाता, मदुराई, सूरत, जबलपूर, रायपूर, वडोदरा, मैसूर, मंगलोर, नागपूर, पटणा, वाराणासी,विजयवाडा, जोधपूर, जालंधर, अमृतसर आणि गुवाहटी यांसारख्या शहरांतही करण्यात आले आहे. 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News