आदरणीय शरद पवार यांच्यावाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीयवकृत्व स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाल्या

Dec 19, 2019

नाशिक :- आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाल्या असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच्या सरकारचे जनक मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८० वा वाढदिवस तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नाशिक, सिन्नर, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार त्यामध्ये एकूण १० विषय देण्यात आलेले आहेत. त्यात शेती आणि साहेब, क्रीडा आणि साहेब, विकास आणि साहेब, समाजकारण आणि साहेब, उद्योग आणि उद्योग, महिला धोरण आणि साहेब, आपत्ती व्यवस्थापन आणि साहेब, संरक्षण आणि साहेब, चव्हाण साहेब ते पवार साहेब, एक परंपरा, पर्यावरण आणि साहेब आदी विषयांवर ७ मिनिटांचे भाषण महाविद्यालयीन युवकांनी करून तालुक्यातील प्रत्येक स्पर्धकाला सन्मानपत्र देऊन तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यानी जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेऊन तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. सदर तालुक्यांमधील विजेत्यांमधून जिल्हास्तरीय ३ विजेत्यांची निवड अनुक्रमे प्रथम श्रेया दिलीप ठाकरे १०००० रुपये (मा.आ.दिलीपकाका बनकर), द्वितीय गायत्री सुनील कोतवाल ५००० रुपये (श्री. दिलीप साळवे पाटील), तृतीय रामजी यशोदा ४००० रुपये अशी रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह व प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातून निवडलेले ३ स्पर्धक हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील राज्यस्तरीय विजेत्यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम रुपये १ लाख, द्वितीय रुपये ५१०००, तृतीय रुपये ३१००० असे रोख बक्षीस व सन्मानचिन्ह  देण्यात येणार आहे. 

नाशिक जिल्हा हा पवार साहेबांच्या विचारांशी बांधलेला जिल्हा असल्याने त्यांच्या विचारांचे विधानसभा सदस्य निवडून आलेले आहेत. नवयुवकांना व युवतींना ५ दशकवीर असलेल्या साहेबांचे शेतकरी, महिला क्रीडा, उद्योग, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण व पुरोगामी विचार आजच्या पिढीमध्ये रुजावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

याच स्पर्धा ऑनलाईन देखील घेण्यात येत आहेत. त्यामध्ये खुला गट असून “महानेता” परिवर्तनाचा व विकासाचा ह्या अधिकृत फेसबुक पेजवर आपला सहभाग नोंदविण्यासाठी ७ ते ८ मिनिटांचे भाषण अपलोड करून दि. २२ डिसेंबर पर्यंत ज्या भाषणास सर्वाधिक लाईक्स येतील त्या भाषणास प्रथम पारितोषिक ५१००० रुपये, द्वितीय ३१००० रुपये व सन्मानपत्र राज्यस्तरीय स्पर्धेच्या वेळी देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्यातील वकृत्व गुणांना वाव देण्यासाठी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले आहे. 

जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग शहर अध्यक्ष अंबादास खैरे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, गोरख ढोकने, अक्षय कहांडळ, तालुका अध्यक्ष विलास रौंदळ, रुपम कोतवाल, अड. भास्कर मेहेंडे, कैलास मोरे, विजय गांगुर्डे, गणेश गायधनी, भुषण शिंदे, सागर शिंदे, मोहन शेलार, दत्तू पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी, संदीप पवार, अरुण आहेर, स्वप्निल भदाणे, निखील आहेर, जयराम शिंदे, अमोल बच्छाव, योगेश जगताप आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News