आठ विदयाशाखांना एकत्रीतपणे मानांकन मिळविणारे पुणे विदयापीठातील पहिले महाविदयालय
नाशिक : शहरातील नामांकित के.के.वाघ अभियांत्रिकी महाविदयालयाच्या आठ विभागांना नुकतेच नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीटेशन (एन.बी.ए) नवी दिल्ली यांसकडून मानाकंन जाहिर करण्यात आले.या ॲक्रीडीटेशन प्रक्रियेमध्ये दिनांक 16 -18 ऑगस्ट दरम्यान तज्ञ समितीने भेट देउन कॉम्प्युटर, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन या पाच विभागांचे परिक्षण करुन मुल्यमापन केले. तर दुस-या टप्प्यात दि. 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान दुस-या तज्ञ समितीने महाविदयालयाला भेट देउन इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि एम.सी.ए या विभागांचे पाहणी केली. या दोन्ही टप्प्यातील झालेल्या भेटीचा अहवाल एन.बी.ए कडे सादर करण्यात आला. त्यावर आधारित निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असून त्यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या सात विभागांना (प्रोडक्शन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल ) या अभ्यासक्रमांना तीन वर्षांसाठी एन.बी.ए चे मानांकन देण्यात आले तर एम.सी.ए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला 2 शैक्षणिक वर्षांचे मानांकन मिळाले. अशा प्रकारे काठिणन्यपुर्ण नविन मुल्यमापन पध्दतीत पात्र ठरणारे के.के.वाघ महाविदयालय आठ विदयाशाखांचे आठ मानांकन मिळवणारे पुणे विदयापीठातील पहिले अभियांत्रिकी महाविदयालय ठरले आहे. या बाबतची पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना प्राचार्य डॉ.के.एन.नांदूरकर म्हणाले की एन.बी.ए मानाकंन मिळविण्या करीता तज्ञ समिती महाविदयालयाच्या सर्व अंगाचा विचार करते. ज्यात समिती महाविदयालयास अचानक केव्हाही भेट देउन संस्थेची सर्वसुविधा युक्त इमारतीचा अभ्यास, प्रयोगशाळेचे स्थिती, प्लेसमेंटची संख्या, मुला-मुलीचे वसतीगृह, शिक्षक-विदयार्थी गुणोत्तर,अध्यापनाची शैली, अशा अनेक बाबींचा बारकाईन विचार केला जातो. या प्रक्रियेमध्ये एकूण 1000 गुण असतात. ज्यात के.के.वाघ महाविदयालयाला 650 गुण मिळाले असून हे मानांकन तीन वर्षासाठी देण्यात आले आहे.हया मानाकंनाचा उपयोग महाविदयालातील शिक्षण घेणा-या विदयार्थ्याला पासआउट नंतर पुढील उच्च शिक्षण अथवा नोकरीत प्राधान्य मिळविण्यासाठी तर होतोच शिवाय विविध विदया शाखेतील वर्ग सुरु करण्यासाठी किंवा संशोधनपर कार्या करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी होतो. सदरच्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी संस्थेच्या इतिहासा बाबत अंशात्मक स्वरुपात माहिती देउन एन.बी.ए मानाकंन मिळाल्याबददल सर्व विभागप्रमुख व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी घेतलेल्या मेहनतीबददल अभिनंदन करत जिल्हयातील जास्तीत जास्त विदयार्थींनी के.के वाघ अभियांत्रिकी महाविदयालयात पदवी कोर्स साठी प्रवेश घेउन हया मानाकंनाचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.या वेळी संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चंट, चांगदेवराव होळकर, समीर वाघ, शकुंतलाताई वाघ व सचिव के.एस.बंदी. डॉ.पी.जे.पवार, व सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





