नाशिक :- जेसीआय ग्रेपसिटी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतिच पार पडली. त्यामध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. पराग घारपुरे पंचवीसावे अध्यक्ष म्हणून तर सचिवपदी महेश दीक्षित यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नाशिकमधील
हॉटेल रॉयल हेरिटेज येथे झालेल्या सभेत जेसीआय ग्रेपसिटीच्या कोषाध्यक्षांनी वार्षिक जमा-खर्चाचा ताळेबंद सादर केला. नवनियुक्त घारपुरे यांच्या कार्यकारणीत केतन ओस्तवाल, प्रसन्ना शिरापुरे, मनोज भुतडा, सुनील रोकडे, मुस्तफा मन्सुरी, प्रकाश बंग, जयेश येवले, आयुष बोरा आणि विनायक पाटील यांचीही विविध पदावर निवड करण्यात आली.
या कार्यकारणी निवड प्रक्रियेत डॉ. आनंद तांबट, स्वप्नील पवार, अजय चव्हाण, पराग जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. जेसीआय ग्रेपसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख, मावळते अध्यक्ष प्रशांत पारख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नवीन निवडून आलेल्या कार्यकारिणीला पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






