नाशिक – बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या तर्फे भारतीय कला दिनाचे औचित्य साधून ‘भारतीय कला दिन का?’ या विषयावर 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संंमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी भूमिका मांडणार आहेत. बुधवारी (दि.1) प. सा. नाट्यगृहाजवळील कै. मु. श. औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधी परिषदेचे अध्यक्ष अशोक हांडोरे तर प्रमुख अतिथी म्हणून परिषदेचे सचिव राज बाळदकर उपस्थित असणार आहेत. यावेळी ‘आद्य नाटककार अश्वघोष ते बोधी रंगभूमी’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून मुख्य मान्यवरांसह पालीभाषा व सौंदर्य शास्त्राचे अभ्यासक देवेंद्र उबाळे व नाट्यलेखक मुकुंद कुलकर्णी त्याामध्ये सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन परिषदेचे कार्यसचिव डॉ. सुरेश मेश्राम करतील. भारतीय कला दिन यापूर्वी कुठेही साजरा केला जात नसे. मात्र बोधी नाट्य परिषदेने कला दिनाची मुर्हूतमेढ रोवत नवे पर्व सुरू केले. 1 जानेवारी भारतीय कला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक भगवान हिरे यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





