नाशिक :- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अर्थ बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी झाले आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड हे पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून चांदवड तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तर सभापती संजय बनकर हे पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कामकाज करत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत पक्ष संघटनेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देवून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादित जागांमुळे अनेक कार्यक्षम व पक्षनिष्ट सदस्यांना संधी देता आली नाही. शेतकरी व ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्या साठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी चांगले काम करेल.
आगामी काळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार व मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे विकासाचे स्वप्न पूर्ण केले जाईल.– अॅड. रविंद्रनाना पगार. जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी





