नाशिक : नाशिक जिल्हा बेकरी चालक/मालक संघटना मार्फत बेकरी खादयपदार्थाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवार 10 जानेवारी 2020 पासून ही दरवाढ लागू होणार असून पावाच्या एका लादीमागे 7 रु प्रमाणे दर वाढ होणार असून पुर्वी मिळणारी एका पावाची (24 नग ) लादी 30 रुपयांवरुन वाढ होऊन नवीन दरानुसार आता ग्राहकांना 40 रुपयांना मिळणार आहे तर खारी ,टोस,डोनट, क्रिमरोल यांच्यामध्ये साधारण 20 टक्के वाढ करण्याचे सर्वानुमते ठरले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून कच्चा मालाच्या किंमती गगनाला भिडल्याने बेकरी उत्पादनांच्या दरात सुमारे 25 टक्के च्या दरम्यान वाढ झाली आहे. बेकरी उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालात मैदा 50 किलो कटटा आधी 1200 रुपये होता तो आता 1500 रु मिळत आहे. तसेच साखर, तेल, तुप,जळाऊ लाकुड, डिझेल,बेकरी कारागीर यांच्या खर्चामध्ये सुध्दा 35 ते 40 टकके वाढ झालेली आहे. त्यामुळे नाईलास्तव बेकरी खादयपदार्थाच्या किंमतीत वाढ करणे अपेक्षीत आहे.
यावेळी संघटनेचे शेख सलीम, राहुल शिंदे, काले खान, मोवीन खान, हसन खान, रोशन खान आदी चालक मालक उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






