वोकहार्ट मध्ये गुडघे शस्त्रक्रिया करणे झाले अधिक सोपे ; प्रगत ” नोव्हो टेक्निक ” द्वारे 25 मिनिटात सर्जरी

Jan 11, 2020

काय आहे नोव्हा टेक्निकचे वैशिष्टये  ?
1) नोव्हो टेक्निक डॉ. जयेश सोनजेचे स्वत:चे पेटेंट
2) सर्जरी करतांना केवळ 15 से.मी कापले जाते.ज्यामुळे कमी रक्तस्त्राव, उघडी जखम जोखीम कमी, जखम लवकर बरी होते.
3) डॉ.सोनजेचा दावा केवळ 25 मिनिटात किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधीत गुडघा रोपण शस्त्रक्रिया.
4) तिरपे झाले गुडघे सर्जरीद्वारे चांगले करुन चालता येणे शक्य.
5) बी.पी,डायबेडीज रुग्ण सुध्दा सर्जरी करु शकता.
6) सर्जरी नंतर गुडघे संबधित कोणतेही औषधी अधिक खाण्याची आवश्यकता नाही.
7) संधीवातांच्या रुग्णांना सांधेरोपण शस्त्रक्रिया सहज व सोपी.
8) रुग्णालयात कमी वास्तव्य
9) लवकर हालचाल व जलद रिकव्हरी

नाशिक : सांधे किंवा गुडघे दु:खीने त्रस्त असलेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. वोकहार्ट हॉस्पिटलच्या डॉ.जयेश सोनजे यांनी एक अदयावत तंत्रज्ञान विकसित करत ” नोव्हो टेक्निक ” द्वारे केवळ 15 से.मी काप देऊन 25 मिनिटात यशस्वी गुडघा रोपण करुन असंख्य रुग्णांना संधिवातापासून मुक्तता दिली आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.जयेश सोनजे म्हणाले की, संधिवात म्हणजे आपल्या सांध्यांची वयानुरुप झालेली झीज. हा कोणताही आजार नसून वयामुळे हाडातील गादीची झीज होते.याचे कारण म्हणजे वाढते वय,वजन, व हाडांची ठिसूळता. गुडघ्यातील दीड सेंटिमीटर च्या गादीची पूर्णत: झीज झाल्यानंतरच गुडघे रोपणाची गरज पडते. म्हणून ” नोव्हो टेक्निक ” द्वारे गुडघ्यातील झीज झालेली गादी काढून त्यावर कृत्रिम धातूचे रोपण करुन सांध्यातील झीज थांबविली जाते. शस्त्रक्रिये नंतर काही तासात रुग्ण चालायला सुध्दा लागतो. शस्त्रक्रियेनंतर औषधे ही अल्पप्रमाणात घ्यावी लागत असल्याने औषधांचा परिणाम किडनी, लिव्हर आणि इतर अवयवांवर होत नाही. या तंत्रज्ञानाने 90 ते 95 वर्ष वय असणा-या रुग्णावरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वोकहार्ट हॉस्पिटल नाशिकचे केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर म्हणाले की डॉ.जयेश सोनजे यांना 3500 हून अधिक शस्त्रक्रियांचा अनुभव असून त्यांना देश-विदेशातील नामांकित रुग्णालयांमध्ये कार्याचा अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारावर त्यांनी ” नोव्हो टेक्निक ” विकसित केली आहे. वोकहाट नाशिक मध्ये अस्थिरोग विभागात उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रुग्ण सौ.मालती दीक्षित (वय 79 वर्ष ) व रुग्ण श्री.सुरेश पार्वते (वय 58 वर्ष) यांनी यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिये बददल डॉ.सोनजे यांचे आभार प्रकट केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News