शारिरीक व्यंग, मंतीमंदपणा व अनुवांशिक आजारांवरही मात करणे शक्य – डॉ आरती पाटील गोवर्धने

Jan 11, 2020

नाशिक : गर्भात वाढणार्‍या बाळाची योग्य वाढ व्हावी यासाठी आईसह घरातील सर्वांकडूनच प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. वेळेवर तपासण्या, रक्‍त चाचण्या या सर्वच टप्प्यातून आईला मार्गक्रमण करावे लागते. मात्र अशातही बाळाला शारिरीक व्यंग, मंतीमंदपणा किंवा एखाद्या अनुवांशिक आजाराचा सामना करण्याची वेळ उद्भवू शकते. यासर्वांवर प्रभावी उपचार म्हणून ‘फिटल मेडिसीन’ वरदान ठरताना दिसत आहे.
फिटल मेडिसीन हे गर्भाशयातील अर्भकाचे (बाळाचे) एकप्रकारचे वैद्यकशास्त्रच आहे. फिटल मेडिसीन तज्ज्ञ सोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भाशयातील बाळाच्या विकास व वाढीचे योग्य निदान करतात. पाच आठड्यात बाळाच्या हृदयाचे ठोके चालू झाल्यापासून ते 9 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाच्या सर्वांगिण वाढीवर देखरेख ठेवण्याचे काम या तज्ज्ञांकडून केले जाते. यामध्ये प्रामुख्याने तिसर्‍या (11 ते 14 आठवडे) आणि पाचव्या (18 ते 22 आठवडे) महिन्याच्या सोनोग्राफीवर अधिक भर दिला जातो.
वास्तविक पहिल्या पाच महिन्यात बाळाच्या बर्‍याच अंशी अवयवांचा विकास झालेला असतो. तेव्हा शारिरीक व्यंग आणि मतिमंदपणाची लक्षणे ओळखण्यावर अधिक भर दिला जातो. अशात बाळाच्या वाढीत काही बिघाड अथवा लक्षणे दिसून आल्यास वेळीच जेनेटिक टेस्टचा सल्‍ला दिला जातो. यामध्ये काही मोठे लक्षणे (Lethal congenital अनोमाली ) आढळून आल्यास जोडप्यास योग्य वेळेत निर्णय घेणे शक्य होते. तर बर्‍याच प्रकरणात बाळावर आईच्या गर्भातच उपचार केले जातात. जसे रक्‍ताची कमतरता असल्यास बाळाला रक्‍त देणे, बाळाच्या वाढीत अडथळा ठरत असलेले गर्भातील अतिरिरक्‍त द्रव्य काढणे, गर्भाची घट होत असल्यास त्याचे निदान करणे आदी.
त्याचबरोबर आई-वडिलांना जर थॅलेसिमिया, tuberous स्क्‍लेरोसिस, न्यूरोफिब्रोमेटोसिस अशाप्रकारचे अनुवांशिक आजार असतील तर तिसर्‍या महिन्यातच या आजारांचे निदाण करणारी चाचणी करणे शक्य होते. गुंतागुंतीच्या गर्भारपणात जसे मधुमेह, उच्च रक्‍तदाब, अपस्मार, थायरॉइड समस्या असेल तर कलर डॉप्लर चाचणीच्या सहाय्याने बाळाची वाढ, गर्भाशयातील द्रव आणि रक्‍तप्रवाह अतिसुक्ष्म पद्धतीने तपासले जातात. या तपासणीअंती प्रसुती योग्य वेळी करण्याचा सल्‍ला दिला जातो.
एकुणच समाजातील सर्वच स्तरांसाठी अत्यावश्यक असलेली ही आधुनिक उपचार पद्धती ‘यशोज्योत फिटल मेडिसीन सेंटर’ येथे उपलब्ध आहे. डॉ. आरती पाटील-गोवर्धने यांनी स्त्रीरोग वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर बंगलोर येथील उच्च शिक्षित डॉ. प्रतिमा राधाकृष्णन् यांच्याकडे तब्बल दोन वर्ष सुपर स्पेशालिटी फेलोशिप केली आहे. सध्या त्या नाशिकमध्ये सेवा देत असून, सदृढ बालकांसाठी त्यांची उपचारपद्धती वरदान ठरत आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News