नाशिक – नुकतेच प्रदर्शित झालेले तानाजी व छपाक चित्रपट महाराष्ट्रात मनोरंजन करमुक्त करण्यात यावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पाठविले आहे. महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमामुळे मुघलांना सळो कि पळो करून सोडले होते ते त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्ध कौशल्याने. युद्धात महाराजांना अनेक मावळ्यांनी साथ दिली. या युद्ध कौशल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगात सर्वत्र पसरली. मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. युद्धात महाराजांनी शौर्याने अनेक गड-किल्ले कसे मिळविले याचा इतिहास खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो परंतु तो सविस्तरपणे शिकविला जात नाही. शिवकालीन इतिहास जगासमोर आणण्यासाठी अनेक चित्रपट येत आहे. त्यातील तानाजी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांचा इतिहास या चित्रपटात दाखविण्यात येत आहे. तसेच सामाजिक प्रश्नांवर आधारित ‘छपाक’ हा सिनेमा समाजात अॅसिड हल्ला पीडित महिलांबाबत एक सकारात्मक संदेश देणारा सिनेमा आहे. पीडितांच्या वेदनेसह आत्मविश्वास व संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या सिनेमातील कथा हि सत्य घटनेवर आधारित असून दिल्लीतील अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर हा सिनेमा बनविण्यात आला आहे.महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा ऐतिहासिक चित्रपट तानाजी व सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट छपाक महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी मनोरंजन करमुक्त करण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




