नाशिक : जैन सोशल ग्रुप प्लॅटीनमचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला अध्यक्षपदी सी.ए. सम्यक सुराणा तर सेके्रटरीपदी इंजि. यश टाटीया तसेच प्लॅटीनम युथ-2020 च्या अध्यक्षपदी राज नहार व सेक्रेटरीपदी विहान कोचर यांची निवड करण्यात आली.
चोपडा लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मोहन बागमार, इलेक्ट प्रेसिडेंट सौ. हेमा लुंकड, पूर्वाध्यक्ष राहुल पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत संस्थापक कमलेश कोठारी यांनी केले प्रास्तविक संम्यक सुराणा यांनी व आभार दिपेश पारख, सुत्रसंचलन पौर्णिमा सराफ यांनी केले. युथ कार्यकारिणीस सतीश हिरण यांनी शपथ दिली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष संम्यक सुराणा, उपाध्यक्ष दिपेश पारख, सेक्रेटरी यश टाटीया, सहसेक्रेटरी धिरज पिचा, खजिनदार सौ.मधुरा साबद्रा, सल्लागार ललीत मोदी, पंकज पाटणी, किर्तीभाई शहा, मोहनजी बागमार, कल्पना पटणी, किरण खाबिया,अतुल जैन, नितिन राका तर संचालकपदी हर्षित पहाडे, अतुल बोहरा, अनुप कटारीया, गौतम भंडारी, निरज शहा, सुनिल बाफणा, अनुप लुणावत, उर्विश कोठारी, जितेंद्र राका, निलेश कोचर, सुनिल कोठारी, आशिष साखला, गितेश बोरा, सौ.नम्रता बाफणा, सौ. मनिषा भंडारी, सौ. संध्या पोकर्णा, सौ. शितल चोपडा यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी अजित सुराणा, सोहनलाल भंडारी, शशिकांत सुराणा, पारस साखला, सुनील चोपडा, हेमंत दुगड, प्रवीण संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




