‘ PetPerfect ‘ सुपरस्पेशालिटी पेट हॉस्पिटल नाशिकमध्ये सुरु !

Jan 28, 2020

नाशिक – पाळीव प्राण्यांमधील कुत्रा, मांजर व सर्व प्रकारचे पक्षी यांच्या आरोग्याची सर्वसमावेशक काळजी घेण्यासाठी नाशिक मध्ये पहिलेच सुपरस्पेशालिटी पेट हॉस्पिटल “पेट परफेक्ट” ची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संचालक डॉ दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. डॉ दिग्विजय पाटील गेल्या ६ वर्षापासून या क्षेत्रात असून अनेक जखमी पक्षांवर सामाजिक जाणीवेतून मोफत उपचार देखील केले आहेत.

” या हॉस्पिटलमध्ये पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी, त्यांना होणारे आजारांवरील निदान व उपचार, शस्रक्रिया तसेच लसीकरण येथे होईल. पाळीव प्राण्यांसाठी नाशिकमधील पहिलीच रक्ताच्या तपासण्या करणारी पॅथॉलॉजी लॅब देखील या हॉस्पिटलचा महत्वाचा भाग असणार आहे.”     –  डॉ दिग्विजय पाटील

सध्या असलेली विभक्त कुटुंब पद्धती, वाढलेला स्क्रीन टाईम, जीवनातील ताण तणाव यामुळे घरातील पाळीव प्राणी असण्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लहान मुले, वयस्कर व्यक्ती, घरातील स्त्रिया यांचा तो पाळीव प्राणी ख-या अर्थाने सोबती असतो असेही त्यांनी नमूद केले.
अनेक सणांमध्ये जसे संक्रांती मधील नायलॉन मांजा, रंगपंचमी मधील रासायनिक रंग. दिवाळीतील आवजी फटाके यामुळे पाळीव प्राण्यांना त्रास होतो. याकरिता नियमितपणे प्रबोधनाचे काम करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी साजरा होणा-या जागतिक पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने मोफत शिबिराचे आयोजनही गत ६ वर्षापासून डॉ दिग्विजय पाटील करत आहेत.

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News