स्टडी इन गुजरात’ अभियानाअंतर्गत रोड शोचे आयोजन
नाशिक : गुजरातला देशातील एज्युकेशन हब अर्थात, शिक्षण केंद्र बनवण्याच्या दृष्टीने गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या ‘स्टडी इन गुजरात’ या अभियानाअंतर्गत आज एका रोड शोचे आयोजन केले होते.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव/विभागीय सचिव श्री. एन. एम. उपासनी या रोडशोमध्ये उपस्थित होते. १ युनिव्हर्सिटी, १३ शाळा आणि महाविद्यालयांमधील ७० मुख्याध्यापकांनी या रोडशोमध्ये सहभाग घेतला.भारतातील इतर राज्यांतील तसेच परदेशांतील विद्यार्थांना गुजरातमध्ये शिक्षण घेण्यासाठी आमंत्रित करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने ‘स्टडी इन गुजरात’ हे अभियान सुरू केले आहे.गुजरातमधील समृद्ध अशा शिक्षणक्षेत्रातील संधींची एक झलक विद्यार्थ्यांना पाहता यावी तसेच आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या शिक्षणाच्या नवनव्या संधींची माहिती मिळावी यासाठी या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना त्या-त्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देता यावी यासाठी एनएबी आणि एनएएसी यांसारख्या मान्यताप्राप्त नावाजलेल्या शिक्षणसंस्थांतील प्रतिनिधींचा या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता.या रोड शोबद्दल बोलताना माननीय शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा म्हणाले, ”गुजरातचे माजी मुख्यमंत्री व भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाने राज्याच्या शिक्षण यंत्रणेच्या रचनेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. जीवनात काहीतरी वेगळे संपादित करण्याची इच्छा असलेल्या तरूणांसाठी विभागीय विद्यापीठे स्थापित करण्याची त्यांची संकल्पना या तरूणांसाठी वरदान ठरली आहे. त्यांना दर्जेदार शिक्षणासाठी राज्याबाहेर किंवा परदेशात जाण्याची गरज नाही, ते सर्वोत्तम पायाभूत सुविधा, वैश्विक स्तरावरील मान्यताकृत अभ्यासक्रम आणि औद्योगिक संधीसह त्यांच्या मायभूमीमध्येच शिक्षण घेऊ शकतात. दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य रचण्याची क्षमता असलेले सर्वोत्तम शिक्षक तयार करण्यासाठी शिक्षकांचे विद्यापीठ सुरू केले. आजच्या काळात सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत आहेत, आपण तंत्रज्ञानाशिवाय आपल्या जीवनाचा विचार करू शकत नाही. तंत्रज्ञानाने प्रगती करण्यासोबत त्यासंबंधीचे गुन्हे देखील वाढले आहेत. हे गुन्हे थांबवण्यासाठी मशिनरी विकसित करणे महत्त्वाचे बनले आहे. यासंदर्भात बोलायचे झाले तर, आम्ही जगातील एकमेव फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ स्थापित केले आहे. हे विद्यापीठ तरूणांना अशा गुन्ह्यांविरोधात लढण्यासाठी सक्षम करते. फक्त १३ वर्षांमध्येच जवळपास ८० देशांनी फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधत नावनोंदणी केली आहे.तसेच आमची चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी, योगा युनिव्हर्सिटी, रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी देखील आहेत. तसेच आमचे भगवदगीता कोर्स, एअरपोर्ट मॅनेजमेंट असे अद्वितीय प्रमाणपत्र कोर्सेस देखील आहेत. असा एक काळ होता, जेव्हा विद्यार्थी डॉक्टर्स व इंजीनिअर्स बनण्यासाठी गुजरातबाहेर शिक्षणासाठी जात होते. पण आता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण व राहण्याची सुविधा देण्यामध्ये सक्षम बनलो आहोत.”विशिष्ट विषयाला वाहिलेली देशातील सर्वाधिक विभागीय विद्यापीठे गुजरात राज्यात आहेत, त्यामुळेच राज्यात सामान्य तसेच विशेष स्वरूपाचे शिक्षण अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजांची मोठी संख्या असून त्यामुळे राज्याने लक्षणीय शैक्षणिक विकास साधला आहे.गुजरातमध्ये असलेली कायदा सुव्यवस्था आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणारे सुरक्षित वातावरण हे या शैक्षणिक विकासामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर देश-विदेशातून, राज्यातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यातील शिक्षणक्षेत्राने भारताच्या व जगाच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्यात बोलवले आहे. सध्या राज्यात १०,००० परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.गुजरातमधील विद्यार्थ्यांनी लक्षवेधक स्वयंरोजगाराचे अभियान राबवले आहे, ज्यातून मोठ्या प्रमाणात स्टार्ट-अप सुरू झाली आहेत. राज्याच्या स्टुडंट स्टार्ट-अप आणि संशोधन धोरणाचा या विद्यार्थ्यांना फायदा झाला.भारतातील नवोदित स्टार्ट-अपपैकी ४६ टक्के स्टार्ट-अप गुजरातमध्ये आहेत. लघु, मध्यम आणि मोठ्या कंपन्या सुरू करण्याला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने अनेक धोरणे तयार केली. त्यामुळेच गुजरातमधील विद्यापीठांतून पदवी घेणारे अनेक विद्यार्थी स्टार्ट-अपची वाट चोखाळत आहेत.कुवेत व दुबईतील विद्यार्थ्यांना गुजरामध्ये शिक्षणासाठी बोलवण्याच्या उद्देशाने गुजरातच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने या महिन्याच्या सुरुवातीला त्या देशांत रोड शोजचे आयोजन केले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला इंदोर, रांची, पटणा, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद आणि रायपूर या शहरांतही अशा रोड शोजचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानाची आघाडीची भागीदार असलेल्या एमएस विद्यापीठाच्या सहकार्याने हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. गुजरातमधील १५ विद्यापीठांचे प्रतिनिधी या रोड शोमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी नाशिकमधील विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.२००३ मध्ये आपले आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी गुजरातला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याच्या स्वप्नासह एका लहानशा सभागृहामध्ये व्हायब्रण्ट गुजरात समिट सुरू केले. गुजरातमध्ये शिक्षण हा गुजरात सरकारचा असाच एक उपक्रम आहे. हा उपक्रम आमच्या राज्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळवण्याची इच्छा असलेल्या जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षून घेईल.





