वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी -उपमुख्यमंत्री अजित पवार

Jan 31, 2020

नाशिक– गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या वैभवात भर घालणारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन व कोनशीलेच्या अनावरण  प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ,उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, डॉ. सयाजीराव गायकवाड, सरपंच जयश्री कडाळे, उपसरपंच राजेंद्र ऊफाडे उपस्थित होते. श्री.पवार म्हणाले,  इमारतीत बसणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी वरखेडा ग्रामपंचायत परिसरातील येणाऱ्या सर्व गरजूंची व  शेतकऱ्यांची सर्व कामे त्वरित करावी. वरखेडा परिसरातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी  ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘लिफ्ट’ सेवा असणारी वरखेडी ही पहिली ग्रामपंचायत ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीत तयार करण्यात आलेले व्यावसायिक गाळे गरजू लोकांना देऊन रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला होता. ग्राम व्यवस्थेकडे लक्ष देण्याचे  तसेच ग्रामव्यवस्था बळकट करण्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यांच्या या संदेशाला प्रत्यक्षात उतरवण्याचे काम महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यांनी समतेची कल्पना मांडली आणि ती अस्तित्वात आली. याच संकल्पनेवर सरकारची वाटचाल सुरू असल्याचे श्री. पवार यांनी  सांगितले.  श्री. पवार यांनी वरखेडी गावाच्या विकासासाठी 25-12 च्या निधीमधून 25 लाख रुपये देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कर्जाच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरचं सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ , शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News