नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने मा. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा सत्कार नाडाचे संस्थापक अध्यक्ष विजय (नाना) पाटील व अध्यक्ष भगवान (नाना) खैरनार यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. ह्याप्रसंगी नाडाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. अॅग्रो डिलर्सच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मा. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिले. होराइझन अॅकॅडमी, गंगापूररोड येथे झालेल्या कार्यक्रमास नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, सरचिटणीस लक्ष्मीकांत जगताप, खजिनदार मंगेश तांबट, कृषी अधिक्षक संजीव पडवळ, सुनील पाटील, विनोद खिवसरा, कृष्णा पगार, बाळासाहेब जाधव, रामभाऊ जाधव, प्रल्हाद खडांगळे, रामचंद्र आहेर, बापुजी भामरे, यश जगताप, अरुण क्षत्रिय आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






