३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल्स येथे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी

Feb 17, 2020

१७ फेब्रुवारी २०२० : संतोष कानडे या महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलोहॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी मयत डोनरकडून हृदय घेण्यात आले. संतोष यांना झालेल्या आजारामध्ये, हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होते. याचे कारण म्हणजे, हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढते व कमकुवत होते. या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पायऱ्या चढताना त्रास होत  होता. वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही त्यांची प्रकृती खालावत चालली होती. तेथील डॉक्टरांनी त्यांना अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे, अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले, डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७ % काम करत होते आणि त्याला तातडीने हार्ट ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्तगट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती. या महिलेला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.”
हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करत मी प्रतीक्षा करत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी ऑर्गन डोनर कुटुंबाचा व ट्रान्सप्लांट करणाऱ्या टीमचा मी अतिशय आभारी आहे.
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे प्रमुख व सीओओ संतोष मराठे यांनी सांगितले, ३ वर्षे इतक्या अल्प कालावधीमध्ये, आम्हाला यशस्वीपणे कामगिरी करणारे (लिव्हर, किडनी, हृदय व बोन मॅरो ट्रान्सप्लांट) पश्चिम भारतातील एक सर्वात आधुनिक ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून गौरवण्यात आले आहे. यामुळे आम्ही लक्षणीय प्रगती करत आहोत आणि स्पेशालिस्टच्या टीमच्या मदतीने उत्तम क्लिनिकल निकाल साध्य करत आहोत.”

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News