हृदयातील अतिरिक्त रक्तवाहिनी विना ओपन हार्ट सर्जरी डिवाईस किंवा बलून तंत्राने ठीक करणे शक्य : बालहृदयरोग तज्ञ डॉ लवणकर

Feb 22, 2020

फक्त अडीच किलो वजनाच्या चिमुकल्यावर विना ओपन हार्ट सर्जरी यशस्वी

नाशिक – वेदांत दैतकर वय ३.५ महिने शिशूला अवघ्या दोन महिन्याचा असतांना न्युमोनिया झाला. इस्पितळात भरती करावे लागले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर व दैव बलवत्तर म्हणून तो त्या आजारातून बचावला आणि घरी गेला परंतु वारंवार खोकला, ताप, दुध व्यवस्थित न पिणे व यामुळे वजन न वाढणे सुरूच होते. देवळा चे डॉ देवेंद्र चव्हाण यांना बाळास काहीतरी त्रास आहे असे लक्षात आले त्यामुळे त्यांनी २डी इको करण्याचा सल्ला दिला. ३ महिन्याचा असतांना आजाराचे निदान झाले. जन्मत: असणा-या हृदयाच्या आजाराचे Congenital Heart Disease – Patent Dutus Arteriosus म्हणजे हृदयातून निघणा-या दोन मोठ्या रक्तवाहिन्यांना जोडणारी एक अतिरिक्त रक्तवाहिनीद्वारे जे शुद्ध रक्त शरीरात पसरले पाहिजे त्यातला बराचसा भाग फुफ्फुसाकडे नेण्यात येतो. त्यामुळे फुफ्फुसांना अतिरिक्त रक्तपुरवठा होऊन वारंवार न्युमोनिया होणे, वजन न वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात वेळीच उपचार न केल्यास हार्ट फेल होऊन बाळ दगावते. वेदांतला हाच आजार होता व त्यामुळे हे दुष्टचक्र काही केल्या संपत नव्हते. बर आता निदान झाले. पण उपचाराचे काय? वय तीन महिने व वजन २.५ किलो. शक्यतो इतक्या कमी वजनाच्या बाळामध्ये ह्या आजाराची ओपन हार्ट सर्जरी केली जाते किंवा मुंबई, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरांमध्ये अतिप्रगत इस्पितळात डिवाईस तंत्राद्वारे म्हणजे मांडीच्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत पोहचून हि अतिरिक्त रक्तवाहिनी बंद केली जाते. जसे मोठ्या माणसांच्या अॅन्जिओग्राफी किंवा अॅन्जिओप्लास्टी केली जाते.
त्यापद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील पहिले बालहृदयरोग तज्ञ डॉ ललित गुणवंत लवणकर, गुणवंत चाईल्ड हार्ट केअर सेंटर यांनी हे आवाहन स्विकारले व उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अडीच किलो वजनाच्या बाळाच्या हृदयातील मोठ्या आकाराची ७ मिमी अतिरिक्त रक्तवाहिनी (Patent Ductus Arteriosus) डिवाईस तंत्राने बंद करण्याची अत्यंत अवघड व किचकट प्रोसिजर पायोनिअर हॉस्पिटल, अशोका मार्ग येथे यशस्वी केली व ४८ तासांत बाळास घरी पाठवण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ संघर्ष मोरे व हृदय रोगतज्ञ डॉ निलेश पुरकर यांनी सहकार्य केले असल्याची माहिती डॉ लवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News