महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्राथमिक प्रमाणिकरणाचा प्रारंभ आज निफाड तालुक्यातील चांदोरी व सिन्नर तालुक्यातील सोंनाबे येथील गावात करण्यात आला. या दोन्ही गावातील 778 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत चांदोरी, ता.निफाड व सोंनाबे ता.सिन्नर येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करुन या योजनेचा शुभारंभ आज जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, एस.पी. रुद्राक्ष, बी.डी. लिलके आदी उपस्थित होते.
चांदोरी व सोंनाबे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. आधार प्रमाणीकरण नोंदणीचे काम आपले सरकार केंद्रावर व संबंधित बँक शाखेत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आज आधार प्रमाणिकरण केले त्या शेतकऱ्यांना पुरावा म्हणुन छापील पावती देण्यात येत असून मोबाईलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरु झाल्याचे एसएमएस येत आहे. या दोन्ही गावात आधार प्रमाणिकरणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याची माहिती श्री.बलसाणे यांनी दिली. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार शेतकऱ्यांना होणार असून जवळपास 1445 कोटी 98 लाख रुपये एवढी थकीत कर्जाची रक्कम आहे. शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे श्री.बलसाणे यांनी सांगितले.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






