नाशिक – नाशिकमध्ये आजपासून चिकन महोत्सव २५ व २६ फेब्रुवारी रोजी डोंगरे वसती गृह मैदानावर सायं ०४ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वास नांगरे पाटील (सी. पी. नाशिक) उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात चिकन बिर्याणी, ड्राय चिकन व उकडलेले अंडे ३० रुपयात आणि महिला व विद्यार्थी वर्गा साठी २५ रुपयात देण्यात येणार आहे. सदरील या महोत्सवात दहा ते बारा हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. तरी आपण सर्वानी या चिकन महोत्सवचा आवर्जून आस्वाद घ्यावा असे जाहीर आवाहन पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे.चिकनची लोकांमध्ये जनजागृती व्हावी या मागील महोत्सवाचे उद़देश्य आहे. केंद्र सरकार तसेच whoने चिकन खाल्याने कोणतेही आजार होत नसल्याचे जाहिर तर केलेच आहे शिवाय कोरोनावायरशी चिकनचा कोणताही संबंध नसल्याचे जाहिर करुन चिकनवर बंदी नसल्याची माहिती जगदीश फडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
या प्रसंगी उद्धव अहिरे, अनिल धुमाळ, डॉ के पी काळे, जगदीश फडके, डॉ सुधीर कुलकर्णी, मधुकर बारी, डॉ साहेबराव राठोड, हेमंत ढाकणे, जितेंद्र सूर्यवंशी, डॉ कृष्णा चाटण कर , डॉ सीताराम शिंदे व डॉ उमेश भामरे उपस्थीत होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






