140 विविध गडकोटांचे पुजन,सरदार विंचूरकरांच्या हस्ते दुर्ग पूजन संपन्न

Feb 26, 2020

किल्ल्याचे डॉ. नारायण गणपतराव विंचूरकर यांच्या हस्ते गडाच्या पहिल्या पायरीचे पूजन करून दुर्ग माथ्यावर दुर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा घेवून तेथे भगवा झेंडा लावून पूजा संपन्न झाली. एकाच दिवशी दुर्गपुजा 23 फेब्रुवारी १९९७ साली रायगड पासुन सुरू केलेली दुर्गपुजा म्हणजे दुर्ग संवर्धन करण्यासाठी किल्यांवर चला असे म्हणणे म्हणजे मोठे अडचणीचे होते. कारण किल्ले फिरायला असतात व त्याची संवर्धन करायची जबाबदारी पुरातत्व विभागाचीच आहे असा समज होता प्राचीन, ऐतेहासिक वास्तुचे जतन व संवर्धन व्हावे तसेच सांस्कृतिक वारशाची माहिती युवा वर्गाला व्हावी या उद्देशाने उपक्रमाला सुरवात करण्यात आली. पुण्यातील मिलिंद क्षीरसागर शिवाजी ट्रेल संस्थेमार्फत हिंदुस्थानातील 140 विविध गडकोटांचे पुजन आज रोजी रविवार दि. 23/02/2020 झाले. त्याचाचं भाग म्हणून अंकाई किल्ल्याचा पुजेचा मान सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे १० वे वंशज डॉ. नारायण विंचूरकर यांना दिला जातो.वीर मराठा सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे शाहू महाराज / पहिले बाजीराव याच्या दरबारातले मोठे सेनापती होते, बादशाहांनी त्यांना उमेद तुलमुल्क बहाद्दूर ही पदवी त्याच बरोबर जहागिरी, जड जवाहीर, स्वतःची तलवार, छत्री, पालखी, उंची पोशाख देऊन गौरव केला होता. त्यांचे संस्थान विंचूर होते.दुर्ग पूजन या कार्यक्रमात मनमाड, कोपरगाव, नांदगाव, नाशिक येथील गिरीप्रेमी अशोक बागुल सर, डॉ. संजय वैद्य, समीहन विंचूरकर, श्री त्रिभुवन सर, पवार सर, चोळके सर, मोरेसर डॉ वैभव निंभोरे, राम शिंदे, नरेंद्र वाघ, राजू सोनटक्के व गावातील तरून मंडळी या कार्यक्रमात सहभागी होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News