‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागीय मंडळाच्या (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) खजिनदारपदी सीए आनंद जाखोटिया यांची निवड

Feb 28, 2020

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय मंडळाच्या (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल – डब्ल्यूआयआरसी) खजिनदारपदी ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचा समावेश असलेल्या या विभागीय मंडळावर पुण्यातील आनंद जाखोटिया खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत. मावळते खजिनदार सीए यशवंत कासार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. ‘डब्ल्यूआयआरसी’च्या अध्यक्षपदी सीए ललित बजाज, उपाध्यक्षपदी सीए विशाल दोषी, सचिवपदी सीए मुर्तझा काचवाला यांची निवड झाली आहे.डब्ल्यूआयआरसी’च्या मंडळाची ही कार्यकारिणी २०२०-२१ या वर्षांसाठी असणार आहे. या विभागात १,१६,००० सीए सदस्य, तर २,५०,००० सीएचे विद्यार्थी आहेत. सीए आनंद जाखोटिया पुणे शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांची ‘डब्ल्यूआयआरसी’च्या सदस्यपदी (२०१९) निवड झाली होती. व्यवस्थापनातील सक्रिय सहभागाच्या जोरावर वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथून आलेल्या आनंद जाखोटियांनी संस्थेच्या विविध पदांवर अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेने (२०१८-१९) राष्ट्रीय व विभागीय स्तरावर उत्कृष्ट सीए शाखा व विद्यार्थी शाखा असे चार पुरस्कार मिळवले होते.’डब्ल्यूआयआरसी’च्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून सीए आनंद जाखोटिया म्हणाले, “सीए इन्स्टिट्यूटमध्ये सीए, विद्यार्थी आणि समाजासाठी अनेक उपक्रम राबविणार आहोत. त्यामध्ये तज्ज्ञांशी संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सीएसआर उपक्रम, समुपदेशन कार्यक्रम, औद्योगिक, शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी समन्वय, चांगल्या पायाभूत सुविधा उभारून देण्याचा आणि त्याचा योग्य उपयोग करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News