अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळता येणे शक्य ! नाशिक अपोलो हॉस्पिटलमध्ये एफ.एफ.आर तंत्रज्ञान विकसीत

Mar 4, 2020

नाशिक : हदयाच्या रक्तवाहिनीमधील ब्लॉकेज आहे की नाही हे ठरविण्यासाठी अँजिओग्राफी हि एकमेव तपासणी केली जाते.जर ब्लॉकेज आल्यास त्यावर अँजिओप्लास्टी करुन निदान केले जाते.परंतु त्या रक्तवाहिनीचे ब्लॉकेजचे प्रमाण किती प्रमाणात आहे हे ठरविण्यासाठी अदयाप कोणतेचे सुनिश्चित तंत्रज्ञान नसल्यामुळे रुग्णावर कारण नसतांना अँजिओप्लास्टी केली जाते.
परंतु एफ.एफ आर तंत्रज्ञानाच्या आधारे आता रक्तवाहिनेचे ब्लॉकेज प्रमाण सुनिश्चित करुन अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळणे देखील शक्य झालेले आहे.
अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये डॉ.शेतकर हयांनी उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिरक जास्त म्हणजे 50 रुग्णांवर एफ.एफ.आर या अत्याधुनिक तपासणीचा वापर केला आहे ज्यात 20 रुग्णांवर अनावश्यक अँजिओप्लास्टी करण्याची गरज नसल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.हार्ट ब्लॉकेज असणा-या रुग्णांसाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आशेचा नवीन किरण असल्याची माहिती डॉ.शेतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अपोलो हॉस्पिटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि वैदयकीय अधिक्षक डॉ.हरी मेनन,हदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अभयसिंग वालिया उपस्थित होते.

काय आहे एफ.एफ.आर तंत्रज्ञान?
एफ.एफ.आर म्हणजे फ्रॅक्शनल फलो रिझर्व्ह हा एक नवीन अत्याधुनिक अविष्कार आहे ज्याने हदयाचा रक्त वाहिनीमधल प्रेशर दाब आणि प्रवाह मोजून ही प्रणाली माहिती देते की ब्लॉकेजमुळे हदयाला खरंच रक्त पुरवठा कमी होत आहे की नाही हे सुनिश्चित केले जाते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News