१५ आशा स्वयंसेविकांचा वॉव तर्फे सन्मान….

Mar 7, 2020

वॉव महिलांच्या दुचाकी रॅली मध्ये २००० हून अधिक बाईकर्णीचा सहभाग

• आशा स्वयंसेविकांचा सन्मान
• १००%’नो हॉंकिंग रॅली’
• १००% हेल्मेटधारक
• २३०० बाईकर्णीसह महिला सायकलिस्ट चा सहभाग

महिलांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक पोलीस आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचं नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. वॉव ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्यांचे हे काम खरोखरं कौतुकास्पद असल्याचंही यावेळी नांगरे पाटील यांनी सांगितले. भरजरी पैठणी, बांधणीची साडी, दागदागिणे…भगवे फेटे, सलवार कुर्ता, जीन्स…अशा रंगीबेरंगी पेहरावात नारीशक्ती पाहायला मिळाली. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांइतक्याच धडाडीने काम करणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ७ मार्च २०२० रोजी वॉव ( वुमन ऑफ विस्डम ) संस्था आणि कम्युनिटी हेल्थ फाउंडेशनच्यावतीने महिला दुचाकी रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला. यंदाच्या वर्षाचे आकर्षण ठरलेल्या ‘नो हॉंकिंग रॅली’ ने सर्वांचेच लक्ष वेधले.
या रॅलीची सुरुवात ठक्कर डोम पासून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
रॅलीच्या उदघाटना प्रसंगी रॅलीला समर्थन करणाऱ्या महिलांचा, रॅलीच्या प्रयोजकांचा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘किप द वूमन अनस्टॉपेबल’ म्हणत विविध वेशभूषेत सुमारे २००० हून अधिक महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक दुचाकी चालक महिलेच्या डोक्यावर हेल्मेट,लष्करी गणवेशातील महिला, फुलपाखरांची वेषभूषा केलेल्या महिला, मराठमोळ्या पोशाखातील महिला, कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करणाऱ्या महिला अशा विविध वेशभूषा केलेल्या महिला आणि समानतेचा संदेश देणारे गट या रॅलीचे खास आकर्षण ठरले.
तसेच वॉव लाल बिंदू बॅग स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांनी वॉव लाल बिंदू बॅग खरेदी केल्या. वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती या स्टॉलच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचबरोबर एचसीजी मानवता कॅन्सर सेन्टरच्या वतीने महिलांच्या कॅन्सरबद्दल स्क्रीनिंग च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रायोजक इकोसेंन्स अप्प्लायन्ससेस अप्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. च्या संचालिका केतकी कोकीळ यांनी महिलांना सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले.ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तसेच शासन आणि नागरिकांमधील दुवा ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा यावेळी विविध मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यात सुरेखा खैरनार, सरळ दिवटे, मिरा देवरे, रंजना गांगोडे, सारिका उन्हवणे, अंजना पवार, सरला अहिरे, सुंदराबाई कुमावत, मनिषा वाघ, शैला फडके, निर्मला नाठे, भिमाबाई खांडवी, साधना वाजे, सुवर्णा सकाळे, सिंधूबाई थोरात ह्यांच्या कार्याचा गौरव सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर हिरोज सपोर्ट्स टू शिरोज मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर शेकडो बाईकरायडर महिलांना घडवणारे कोच विजेंद्र सिंग यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सहभागी समुहांना विविध बक्षिसांनी गौरविण्यात आले. उत्कृष्ट संकल्पनेसाठी – भारतातील विविध क्षेत्रातील पहिल्या महिलांची वेशभूषा केलेला ग्रुप, मिस युज ऑफ मोबाईल, करोणा व्हायरस जनजागृती, अवयव दान जनजागृती ग्रुप. पारंपरिक वेषभूषेसाठी – हिरकणी ग्रुप, सुपर वूमन ग्रुप. सर्वात मोठा ग्रुप – बिईंग वूमन ग्रुप, जेष्ठनागरिक महिलांमध्ये ८० वर्षीय मनीषा पाथरुडकर आणि ७२ वर्षीय प्रमिला पाटील यांसह नाशिक सायकलिस्ट ग्रुप, बाईक रायडर्स ग्रुपसह विविध महिलांना यावेळी गौरविण्यात आले. झुंबा डान्स, लकी ड्रॉ, सेल्फी पॉईंट्स सह महिलांनी रॅलीचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परी जोशी यांनी केले. यासाठी वॉव – (वूमन ऑफ विस्डम) समूहाच्या अश्विनी न्याहारकर, रेखा देवरे, विद्या मुळाने, आदया टकले, वैशाली गुप्ता, मनीषा आहेर, शुभांगी कोठुळे, माधुरी कोतवाल, संगीता मदन, सीमा बयनवार, शिल्पा दरगोडे, अर्चना बोथरा, वंदना लोहाडे, मनीषा आहेर, माधुरी कोतवाल, शुभांगी कोठुळे, सुषमा जाधव, वैशाली पोतदार, करुणा बगाडे, शालिनी सुर्वे, नीलिमा चौधरी, रेखा म्हस्के, सुनंदा रहाणे, रितू मेहरा, निशा पिंगळे, सपना बुटे, उज्ज्वला बोधले, निलीमा चुंभळेंसह २०० हून अधिक सभासद महिलांनी आणि कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News