नाशिक :- कालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा साधना, नाशिक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त ८ मार्च,२०२० रोजी रोजी “नवदुर्गा पुरस्कार ” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १०वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जातअसून हे या कार्यक्रमाचे ११वे वर्षे आहे. या कार्यक्रमात कला, क्रीडा, सामाजिक, वैद्यकीय, उद्योग, राजकीय, कायदा विषयी अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ” नवदुर्गा पुरस्कार ” प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारर्थीमध्ये सौ. हेमांगी पाटील, सौ. ममता कुलकर्णी, सौ. संगीता गायकवाड, सौ. अमृता पवार, डॉ. प्रणिता गुजराथी, .अँड. वसुधा कराड,.सौ. वैशाली वाघ, सौ. चैताली बोरस्ते- कदम, सौ. ज्योती निरगुडे यांचा समावेश असणार आहे . याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या ११ महिलांनाही यावेळी महिला पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी दिली
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





