नाशिक – महिला आरोग्य या विषयावर समाजप्रबोधन व जनजागृतीचे कार्य करणाऱ्या नाशिक जिल्हा स्त्री रोग तज्ञांची संघटना ‘नाशिक ऑबस्टेट्रीक व गायनाकोलॉजिकल’ सोसायटीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 11 मार्च(बुधवार) रोजी ‘तू नारायणी’ या स्त्री आरोग्याविषयी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ.नलिनी बागुल यांनी दिली.
सर्वांसाठी खुला व पूर्णत: मोफत असलेला हा कार्यक्रम दि. 11 रोजी संध्याकाळी 4.30 वा कालिदास कलामंदिरात होणार असून या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपट अभिनेत्री स्मिता तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान समाजातील काही कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या आयोजनाच्या भूमिकेविषयी सांगतांना कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. निवेदिता पवार व डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या की समाजाच्या जडणघडणीमध्ये स्त्री आरोग्य हे महत्वाचे असून वयोपरत्वे स्त्रीच्या शारीरिक व मानसिक स्थितीत अनेक बदल होत असतात.मासिक पाळी,गर्भधारणा,प्रसूती, रजोनिवृत्ती अशा विविध टप्प्यातून जातांना स्त्रियांना याबाबतची माहिती सरळ,सोप्या भाषेत व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला दिनाच्या आचित्यार्थ निबंध स्पर्धाचे आयोजन केले असून “माझ्या मनातील आजची स्त्री” या विषयावर एक निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली असून इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका ३०० शब्द मर्यादा असणा-या निबंधासहित डॉ निवेदिता हॉस्पिटल कॉलेज रोड किंवा डॉ बागुल हॉस्पिटल गंगापूर रोड येथे दिनांक 11 मार्च पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत जमा करण्याचे सांगण्यात आले आहे.हया निबंध स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकांना ११ मार्च च्या कार्यक्रमात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणा-या महिलांना अर्ध्या किंमतीत थायरॉईड (25 रुपये ), मेमोग्राफी (1200 रुपये ) व पॅप्सस्मेयर (350 रुपये ) या चाचण्या करता येतील. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यवाहक डॉ.मनीषा जगताप व सचिव उमेश मराठे यांच्यासहित सर्व सदस्य कार्यरत आहेत.
किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न
नाशिक: नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता...






