नाशिक – ‘महिला उद्योजकता व सक्षमीकरण’ या विषयावर सलग ५४० मिनिटे (९ तास) मार्गदर्शनपर भाषण देऊन नाशिककर उद्योजिका प्रेमलता मिश्रा यांनी अनोख्या व आगळ्या वेगळ्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद जीनियस बुक्स ऑफ रेकॉर्ड्स [ Genius books of records] मध्ये करण्यात आली आहे . त्यांच्या प्रतिनिधी अमी छेडा यांनी विक्रमाचे प्रमाणपत्र प्रेमलता मिश्रा यांना सुपूर्त केले . हे सादरीकरण के. के. वाघ पॉलिटेक्निक च्या आडगाव नाका येथील महाविद्यालयात करण्यात आले . त्यांच्या या सादरीकरण ची सुरुवात सकाळी ८.३० वा करण्यात आली. प्रेमलता मिश्रा यामध्ये महिला उद्योजकता याबाबत विविध विषयांवर संपूर्ण वेळ उभे राहून एकदाही ब्रेक न घेता संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत भाषण दिले . या उपक्रमासाठी के.के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व प्राचार्य पी.टी. खांदवे यांचे सहकार्य लाभले . नियमाप्रमाणे या संपूर्ण भाषणाचे चित्रीकरण करण्यात आले असून या विक्रमाचे नाव ‘जगातील सलग सर्वाधिक वेळेचे जाहीर लेक्चर’ असे राहणार आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






