नाशिक – देशभर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या साथरोगाशी संबंधित प्रतिबंधात्मक उपचारासाठी व यासंदर्भातील आवश्यक माहितीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण 4 माहिती केंद्रे स्थापन करण्यात आले आहे.
नागरिकांना कोरोना आजारासंबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास खालील दूरध्वनी क्रमांक व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी केले आहे.
माहिती व मदतीसाठी ….
• जिल्हा रुग्णालय, नाशिक फोन नं. 0253-2572038/2576106, टोल फ्री क्र.104
• नाशिक महानगरपालिका नाशिक फोन नं. 0253-2590049, टोल फ्री क्र.104
• जिल्हा परिषद नाशिक फोन नं. 0253-2508512, टोल फ्री क्रमांक 1075
• मालेगाव महानगरपालिका फोन नं. 02554-231818, टोल फ्री क्रमांक 104
——
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





