झी एन्टरटेन्मेंट ने केला कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र

Apr 9, 2020

प्रसार माध्यम आणि करमणूक या क्षेत्रांतली दिग्गज कंपनी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस हिने कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याचा निश्चय केला आहे. या कंपनीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करणाऱ्या ५ हजारहून अधिक रोजंदारीवरील मजुरांना अर्थसाह्य करण्याचे कंपनीने ठरविले आहे. कोरोना व्यायरसच्या साथीमुळे सर्वत्र टाळेबंदी लागू झाली, तिचा सर्वाधिक फटका या कामगारांना बसत आहे. अशावेळी माध्यम व करमणूक क्षेत्रातील जबाबदार कंपनी या नात्याने सध्याच्या प्रतिकूल काळात या कामगारांना मदत करण्याचे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून झी ने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नागरीक सहाय्य व आपत्कालीन मदत निधी मध्ये (पीएम केअर्स फंड) योगदान देण्याच्या उद्देशाने झी ने देश-विदेशातील आपल्या माध्यम प्रणालीचा उपयोग करून १.३ अब्ज नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. याचबरोबर, झी नेटवर्कमधील आपल्या ३५०० कर्मचाऱ्यांना पीएम-केअर्स फंडामध्ये स्वतःहून योगदान देण्याची संधीही कंपनीने अंतर्गत प्रणालीद्वारे मिळवून दिली आहे. या कर्मचाऱ्यांकडून जेवढी रक्कम गोळा होईल, तेवढ्या ररकमेची भर कंपनी स्वतः घालणार आहे व एकूण रक्कम पीएम-केअर्स फंडाला देणगी दाखल देणार आहे.या संदर्भात बोलताना झी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका म्हणाले, आमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या सर्व रोजंदारी कामगारांना आर्थिक साह्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन लढा देणे, हाच आमचा मंत्र आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत भारतीय उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय कार्यास बळ देण्याची आवश्यकता आहे. या कार्यास अर्थसाह्य करण्याबरोबरच देशव्यापी जनजागृती करण्याचे आमचे नियोजन आहे. देशात आणि परदेशांतही आमची व्याप्ती लक्षात घेता, आम्ही दर्शकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. सर्व देशाने एक कुटुंब म्हणून एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे.’’

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News