नाशिक : आज नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरूण पुरूषाला कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आले आहे तर मालेगाव मध्ये आत्ताच प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४६ कोरोना संसर्गित असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
नाशिक शहरातील रूग्ण हा डॉ. जाकीर हुसेन रूग्णालयात उपचार घेत असून तो नाशिक येथील समाज कल्याण वसतीगृह परिसरातील रहिवासी आहे. तसेच मालेगावमधील वाढलेले ४ रूग्ण हे २५ वर्षीय पुरुष (मोमीनपूरा), २६ वर्षीय महिला (मोमीनपूरा), ५० वर्षीय महिला (नयापूरा), ४० वर्षीय पुरुष (मालेगांव) येथील असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक यांनी कळविले आहे.
त्यामुळे नाशिक शहरातील रूग्ण संख्या आता ७ झाली असून मालेगाव मध्ये ३९ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना पॉझिटिव्ह असून त्यात धुळे येथे मृत झालेल्या महिलेचा समावेश नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्येत न करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत, असे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी कळविले आहे.




