नाशिक – कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना पोलीस प्रशासन आपली भूमिका कणखरपणे राबवत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात सीएसआर ऍक्टिव्हिटी अंतर्गत पोलिसांना ३०० कीट्सचे वाटप केले. त्यात ५०० एमएल सॅनिटायझर, एन – ९५ मास्क व फेस शिल्डचा चा समावेश होता. भारतीय स्टेट बँकेचे उत्तर महाराष्ट्र महाप्रबंधक बलदेव प्रकाश यांच्या हस्ते नाशिक ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडे हे किट्स सुपूर्द करण्यात आले.
त्यांनतर कोरोनामुळे भलेही संपूर्ण जग थांबलेले आहे. पण या थांबलेल्या जगाला परत जोमाने चालू करण्यासाठी आणि जीवदान देण्यासाठी अहोरात्र डॉक्टर प्रयत्नशील आहेत. अचानक उद्भवलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड देऊन रुग्णाचा प्राण वाचवणारे डॉक्टर देवदूत आहेत. याचीच दखल घेऊन भारतीय स्टेट बँकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून एसबीआय फाऊंडेशनच्या वतीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून ६०० पीपीई किटचे वाटप केले. यात भारतीय स्टेट बँकेचे उत्तर महाराष्ट्र महाप्रबंधक बलदेव प्रकाश यांनी डॉ. निखिल सैंदाणे यांच्याकडे ६०० पीपीई किट सुपूर्द केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक सुनील राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल हडपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, भारतीय स्टेट बँक, नाशिक झोनचे उपमहाप्रबंधक मुकेश कुमार सिंह, नाशिक ग्रामीणचे क्षेत्रीय प्रबंधक अर्थबंधू बोहरा, भारतीय स्टेट बँकेचे सुरक्षा अधिकारी दुर्गेश दुबे, जनसंपर्क अधिकारी यज्ञेश झवर यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






