कृषी विक्रेत्यांचा संपास उत्स्फुर्त प्रतिसाद

Jul 10, 2020

नाशिक : सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या बियाणांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार कृषी विभागाने सुरु केलेल्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स, डीलर्स असोसिएशनने दि. १० जुलै पासून तीन दिवस बंद पुकारण्याचा निर्णय घेतला. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करण्याची रेलचेल सुरु झाली आहे. हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची बियाणे पेरणी केल्यानंतर उगवलीच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागास प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत कृषी विभागांनी राज्यभर सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विक्रेत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. या कारवाई विरोधात माफदा संघटनेने बंदचे हत्यार उगारले असून कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. कृषी सेवा केंद्रे हे सरकारमान्य कंपन्यांमधून प्रमाणिकरण झालेल्या बियाण्यांचीच खरेदी करतात. आणि तोच पॅक माल शेतकऱ्यांना विकतात. बियाण्यांचे उत्पादन करणे व गुणवत्ता प्रमाणीकरणाचे काम हे संबंधित कंपनीचे आहे. त्यामुळे बियाणे उगवले नाही म्हणून विक्रेत्यास जबाबदार धरणे आणि गुन्हे दाखल करणे योग्य नाही. विक्रेत्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यभर पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते यात सहभागी झाले आहेत. कृषी विक्रेत्यांना न्याय मिळावा अशी मागणी नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान नाना खैरनार यांनी केली.
नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रे बंद ठेवण्यात आली असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सर्व तालुक्यातील सदस्यांनी तेथील तहसीलदारांना निवेदन देत मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. नाशिक ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विजय नाना पाटील, अध्यक्ष भगवान नाना खैरनार, उपाध्यक्ष अरुण मुळाणे, सरचिटणीस लक्ष्मीकांत जगताप, खजिनदार मंगेश तांबट यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून पुढेही बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News