जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सव

Aug 8, 2020

नाशिक :- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने नऊ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था , संभाजी चौक , नाशिक या संस्थेच्या प्रांगणात सकाळी साडेदहाला या महोत्सवाचे उदघाटन होणार असून , शेतकरी आणि ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले आहे .

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात श्री. पडवळ यांनी म्हटले की, रानभाज्यांमध्ये कंदभाज्या , हिरव्या भाज्या , फळभाज्या , फूलभाज्या इत्यादी रानभाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला आढळून येतात. त्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .

रानभाज्या महोत्सवामध्ये आदिवासीबहुल भागातील रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात येणार आहे. त्याबरोबरच रानभाज्यांची ओळख , आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व , लागवड , विविध प्रक्रिया , पाककृती याबाबत त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील . याद्वारे रानभाज्याने ओळख मिळून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्य होईल . तसेच त्यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल . शहरातील नागरिकांनी कोविड -19 च्या बाबतीतील नियम पाळून या महोत्सामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन श्री . पडवळ यांनी केले आहे .

0000000000

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News