कामशक्तिवर्धक कंदमुळी : विदारीकंद

Jul 2, 2019

पुरुषांसाठी शक्तीवर्धक टॉनिक,वीर्य धातूंची वाढ करणारे, वात, पित्त ,धातुक्षय ,कमजोरी, शीघ्रपतन, नपुंसकता ,तसेच यौन कमजोरी दुर करणारे  रसायन

विदारीकंदाचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत प्रभावशाली आयुवैदिक औषधी म्हणून विदारीकंद असून याच्यात उपलब्ध असलेल्या महारसायनामुळे कमालीची कामशक्ति व्यक्तीमध्ये प्रज्वलित होते.
विदारीकंद हे एक कंदमुळ असून हिमालय व त्याच्या आजपासच्या क्षेत्रांमध्ये नदी-नाल्याच्या किना-यावर पहायला मिळते.हयाचे झाड वेलींसारखे असून त्याच्या मुळीला अनेक कंदमुळे येतात.हे कंद फळाचा उपयोग औषधी म्हणून उपयोगात आणले जाते.वेली गोलगोल वाढत जाणारी, पाने गोलाकार ,देठ आकाराने मोठे,पाने पळासाच्या पानांसारखी तीनच्या संख्याने लांबी 4 ते 6 असून रुंदी 2 ते 3 इंचापर्यंतची असते.फुले येण्‍याचा हंगाम साधारणत: नोव्हेंबर आणि डिसेंबर असतो. फुले निळसर रंगांची असतात.घोडे आणि हत्तीचे आवडते खादय असल्यामुळे याला गजवाजिप्रिया असे पण म्हणतात.
औषधी उपयोग –
विदारीकंदाच्या फळांमध्ये मोठया प्रमाणात प्रोटीन, कार्बोहाइड्रेट,राळ उपलब्ध असतात . चवीला गोड आणि बटाटयासारखे स्ग्निध असते.त्यामुळे याचा उपयोग स्तनातील दूध वाढीसाठी ,शुक्रवर्धक ,कंठ सुधारक, मुत्रजन्य आजार आणि कामशक्ती वाढविणारे आहे. औषधी गुणाने शीतवीर्यकारक असल्यामुळे पित्त ,रक्त आणि वायू विकारांवर आराम मिळविणारे आहे.
विदारीकंदाच्या चुर्णाच्या उपयोग – पुरुषांसाठी शक्तीवर्धक टॉनिक,वीर्य धातूंची वाढ करणारे, वात, पित्त ,धातुक्षय ,कमजोरी, शीघ्रपतन, नपुंसकता ,तसेच यौन कमजोरी दुर करणारे यात रसायन असल्यामुळे शीघ्र परिणाम देणारी आयुर्वेदीक औषधी आहे.नुकत्याच बाळांतीण झालेल्या महिलांना स्तनात दुध वाढीसाठी, वजन न वाढणारे अशक्त बालकांच्या संपुर्ण विकास व ताकदीसाठी विदारीकंदाचे चुर्ण मधांमध्ये दिल्यास नक्की फायदा होतो.
1. स्तनांमध्ये दूधवाढीसाठी – ज्या महिलांची प्रसव होऊन स्तना मध्ये दूध कमी निर्माण होत असेल तर 4 ग्राम चूर्ण
सकाळ-संध्याकाळ खडीसाखर व दूधाबरोबर 15 दिवस घेतल्यास फायदा होतो .
2. अधिक रक्तस्त्राव – मासिक पाळीच्या काळात ज्या महिलांना अधिक रक्तस्त्राव होत असेल तर एक चम्मचा विदारीकंद चुर्णामध्ये
थोडेसे तुप आणि साखर घालून सकाळ-संध्याकाळ चाटन घेतल्यास लाभ मिळतो.
3. मुलांमधील दुर्बलता – जे मुले शरीरांने दुबली-पतली आहे अशांना 2 ग्राम चुर्ण मधाबरोबर चाटन दिल्यास मुलांमध्ये बल वाढून शरीर यष्टी सुधारते.
4. यक्रत विकार – ज्या व्यक्तींना यक्रताचे आजार होत असेल विदारीकंदाचे चुर्ण् मधाबरोबर घेतल्यास लाभ मिळतो.
5. वीर्य वाढीसाठी – या वनस्पतीच्या औषधी रसायनामुळे संपुर्ण शरीरात सप्तधातू पोषण करण्याची ताकद आहे.याच्या नियमित सेवनामुळे वीर्य वाढ होउन शीघ्रपतन व नपुसंकता दुर होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News