‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या कार्याला सलाम’ : भुजबळ

Oct 24, 2020

नाशिक: ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ हे नेहमीच नाविन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान आपल्या रुग्णांच्या सेवेत घेऊन येत असते. अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अशा या कॅन्सर सेंटरने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. या सेंटरमध्ये अद्ययावत न्यूक्लीयर मेडिसिन विभागाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. आज दि. २४ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या विभागाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉ. समीर चंद्रात्रे, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर, न्यूक्लीयर मेडिसिन सिनियर कंन्सल्टंट डॉ. चैतन्य बोरडे, न्यूक्लीयर मेडिसिन कंन्सल्टंट डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतातील सहकारी वनशेतीचे जनक अशी ओळख निर्माण करणारे नाशिकमधील ज्येष्ठ नेते व साहित्यिक विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ. राज नगरकर यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

न्यूक्लीयर मेडिसिन सिनियर कंन्सल्टंट डॉ. चैतन्य बोरडे यांनी न्यूक्लीयर मेडिसिन विभाग, पेट सिटी स्कॅन, गॅमा कॅमेरा, गॅलियम जनरेटर आणि ४ आयोडीन थेरपी वॉर्ड ची माहिती दिली. तर २०१३ पासून आतापर्यंत १६,६०० पेक्षा अधिक रुग्णांनी पेट सिटी स्कॅनचा लाभ घेतला आहे. नाशिककरांनी पुणे-मुंबई न गाठता एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमधील अद्ययावत सेवांचा लाभ घेऊन आपला कॅन्सर बरा करावा असेल आवाहन बोरडे यांनी केले.

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर म्हणाले कि मला आनंद वाटतो कोरोना संसर्ग काळात ३ बॉनम्यॅरो कॅन्सर सर्जरी यशस्वीपणे पार पडल्या. त्याचबरोबर एका वर्षांमध्ये ३१५ रोबोटिक सर्जरी झाल्या. यावेळी नगरकर सरांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात नाशिक कुठे हे म्हणण्याची वेळ कुणावर येऊ नये आणि नाशिक आपण जगाच्या नकाशावर निश्चितपणे घेऊन जाऊ असा विश्वास नगरकर यांनी व्यक्त केला.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉ. समीर चंद्रात्रे म्हणाले कि, मानवतेचा नुसता बोर्ड न लावता कोरोना काळात देखील रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सेवा पुरविल्या बद्दल सर्व टीमचे आभार व्यक्त करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज नगरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. नाशिकचे हवामान अनुकूल असून नाशिकनी कलाकार, डॉक्टरर्स इ. निर्माण केले आहेत. पुणे – मुंबई ला न जाता नाशिकमध्येच कॅन्सर रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरवीत त्यांना बरे केल्या बद्दल मानवता कॅन्सर सेंटर च्या कार्याला भुजबळ सरांनी सलाम ठोकला आणि नगरकर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यूक्लीयर मेडिसिन कंन्सल्टंट डॉ. प्रशांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News