नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया, कोल्हापूर ते नाशिक ग्रीन कॉरिडोर ..!

Nov 24, 2020

नाशिक : कोल्हापूरमधील डायमंड हॉस्पिटलमध्ये २२ नोव्हेंबर २०२० रोजी एका ५५ वर्षीय रुग्णाचा ब्रेन डेड झाल्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नियमावलीनुसार क्रमवारीप्रमाणे अपोलो हॉस्पिटल नाशिक येथिक नोंदणीकृत ५५ वर्षीय व्यक्तीला ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत देण्यात आले.अपोलो हॉस्पिटल मुंबई आणि अपोलो हॉस्पिटल नाशिकच्या अवयव प्रत्यारोपण टिमने कोल्हापूर ते नाशिक असा ४९२ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ५.३० तासात ग्रीन कॉरीडोर करून पार केला. या ग्रीन कॉरिडोर करिता कोल्हापूर शहर व ग्रामीण पोलिस, पुणे शहर व ग्रामीण पोलीस आणि नाशिक शहर व ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.हि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विक्रम राऊत, डॉ. अशोक थोरात, डॉ. केतूल शहा, डॉ. अमृतराज, तसेच जनरल सर्जन डॉ. मिलिंद शहा, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. धवल चोकसी, लिव्हर ट्रान्सप्लांट भूलतज्ञ डॉ.अंबरीन सावंत, डॉ.हर्षित चकसोता, डॉ.भूपेश पराते, डॉ. चेतन भंडारे यांनी केली. याकरिता अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि अपोलो हॉस्पिटल नाशिकमधील अवयव प्रत्यारोपण समन्वयक व इतर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले अशी माहिती अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रसाद मुगळीकर यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News