अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स NABH या प्रतिष्ठित नामांकनाने सन्मानित

Nov 25, 2020

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक नुकतेच NABH या प्रतिष्ठित नामांकनाने सन्मानित करण्यात करण्यात आले. NABH म्हणजेच National Accreditation Board for Hospitals and Healthcare Providers. NABH हे भारतातील वैद्यकीय संस्था, रुग्णालये यांच्यासाठी रुग्णाच्या सुरक्षेसंबंधित आणि रुग्णाच्या घेण्यात येणाऱ्या काळजी विषयी रुग्णालयांची गुणवत्ता ठरवितात.

श्री सचिन बोरसे – क्लस्टर हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार,”रुग्णाची सुरक्षा आणि काळजी ह्या महत्वाच्या मूल्यांना केंद्र स्थानी ठेवून NABH ने सामान्य रुग्णांना एक पारदर्शकता दिली आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक यांनी रुग्णाच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व तत्वांना म्हणजे गुणवत्ता, सुरक्षा, कार्यक्षमता आणि जबाबदारी यांची सातत्याने सुधारणा आणि व्यवस्थापन करून NABH सन्मान मिळविला आहे. सामान्य रुग्णांना यामुळे फायदा तर होतोच पण रुग्णालय पाळत असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिष्टाचारामुळे रुग्णालयाची गुणवत्ता वाढते. आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या याच तत्त्वांमुळे आज ते “NABH Ashoka Medicover Hospitals” म्हणून ओळखले जाणार आहे.”

कोणत्याही रुग्णांना कायमच आदरयुक्त, मानाने, सभ्य वागणूक देण्यात यावी हा प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे. रुग्णांविषयी सहानुभूती राखून अशोका मेडिकव्हर मधील प्रत्येक कर्मचारी आणि व्यवस्थापन रुग्णसेवेचे कार्य पार पाडत आहेत. निर्णयक्षम आणि अनुभवी डॉक्टर्स, प्रशिक्षित आणि कार्यप्रवीण कर्मचारी, पारदर्शक व्यवहार, वैद्यकीय तपशील, संसर्ग मुक्त वातावरण, औषधांच्या यादीतील तसेच रुग्णाला देण्यात येणाऱ्या उपचारातील पारदर्शकता अशा अनेक तत्वांवर गेल्या २ वर्षांपासून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल कार्यरत आहे. आणि त्याचेच परिणामी फळ म्हणजे NABH सन्मान.

रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनी रुग्णालयाविषयी सांगितले कि “खूप कमी कालावधीत महाराष्ट्रातील या रुग्णालयाने नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांमध्ये आरोग्य सेवेविषयी विश्वास निर्माण केला आहे. रुग्णालयाची विस्तीर्ण वास्तू असून अगदी सामान्य रुग्णांना परवडेल अशा दरात उत्तम उपचार, औषधे आणि तज्ञ डॉक्टरांची रुग्णसेवा देण्यात येते. रूग्णांच्या नातेवाईकांची रहाण्याची सोय, वाहनतळाची उपलब्धता, जेवण्याची सोय, सर्व आरोग्य विमा स्वीकारले जात असून, कमीतकमी वेळात योग्य उपचार करून रुग्णांना घरी पाठवण्यात येते.”

प्रयत्नपूर्वक उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या आणि अविरत रुग्णसेवा देणाऱ्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक येथील श्री सचिन बोरसे – क्लस्टर हेड, डॉ सुशील पारख – मेडिकल डायरेक्टर, डॉ सागर पालवे – ऑपेरेशन हेड (महाराष्ट्र), डॉ सारंग गोयल – मेडिकल सुपरिंटेंडंट, श्री समीर तुळजापूरकर – मार्केटिंग हेड आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ….

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News