अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ला उत्कृष्टरुग्णसेवेसाठी नॅशनल अवॉर्ड पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले

Jan 7, 2021

नाशिक :  एनएबीएच (NABH)  मानांकन प्राप्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ला नुकतेच उत्कृष्ट रूग्णसेवेसाठी इंटिग्रेटेड हेल्थकेअर अॅन्ड वेलबिंग काउन्सिल कडून देशव्यापी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आणि खूप कमी कालावधीत नावारूपाला आलेले रुग्णालय आहे . सर्वोत्तम तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी तत्पर, विस्तीर्ण आणि सर्व सोईसुविधा असलेली रुग्णालयाची वास्तू म्हणजे अशोका मेडिकव्हर. दोन वर्ष इतक्या कमी काळात रुग्णालयात ७० हजार पेक्षा अधिक रुग्णांनी वेगवेगळ्या विभागात वैद्यकीय उपचार घेतले आहेत. कमी वेळेत उत्तमरीत्या रुग्णसेवा देऊन निरोगी आरोग्य देणारे रुग्णालय म्हणून अशोका मेडिकव्हर  ने आपली ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक यंत्रणा, स्वच्छता आणि वेळोवेळी निर्जंतुकीकरण हे अशोका मेडिकव्हर  चे प्रमुख वैशिष्ट्य. युरोपिअन रुग्णालयाचे प्रोटोकॉल असलेले रुग्णालय अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमुळे नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रालाही खूप मदत झाली अन् खऱ्या अर्थाने नाशिकमधील मेडिकल हबची मुहूर्तमेढ झाली, असं म्हणाव लागेल.

हृदयरोग, किडनी विकार, बालरुग्ण तसेच नवजात अभ्रकां मधील आजार, मधुमेह, स्त्रीरोग व प्रसूती संबंधित आजार, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, दंतविकार, नेत्र विकार विभाग अशा सर्व वैद्यकीय सेवांमधे पारंगत तज्ज्ञ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये रुग्यसेवा देत आहेत. लहानमुलांसाठी आधुनिक यंत्रणायुक्त सर्वांत मोठा विभाग असलेले एकमेव रुग्णालय, स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्राला महत्त्वाचे स्थान देणारं रुग्णालय अशी ओळख आज अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने गेल्या वर्षभरात निर्माण केली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रशस्त रुग्णालय, अँब्युलन्स ची व्यवस्था, महानगरपालिकेसाठी मोफत अँब्युलन्सची व्यवस्था २४ तास अतिदक्ष सेवा आणि औषधे यांचे बॅकअप, सिटी स्कॅन आणि एमआरआई साठी सर्वोत्कृष्ट मशीन, बाह्य रुग्ण आणि अंतर्गत रुग्ण यांना वेगवेगळ्या औषधालयाची व्यवस्था अशा नानाविध सुविधा एकाच छताखाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल उपलब्ध आहे. अशोका मेडिकव्हरच्या सेवाभावी कामकाज प्रणालीमुळे विविध सामाजिक, प्रसार माध्यमांसह विविध राजकीय- सामाजिक संस्थांनी दखल घेत पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे क्लस्टर हेड श्री. सचिन बोरसे म्हणाले कि, कोविड काळातही अगदी २ वर्षाच्या बाळापासून ते १०२ वर्षीय वयोवृद्ध आजींपर्यंत अनेक रुग्ण पूर्ण आणि यशस्वी उपचार देऊन बरे करण्यात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स नाशिक यांचे महत्वाचे कार्य आहे. अत्यावस्थेत असणाऱ्या रुग्णाला देखील दाखल करून घेण्यास कधीही नकार न देता उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेवाभाव आणि रुग्ण यांची सांगड घालून करण्यात येणाऱ्या कार्यास मिळालेल्या या पुरस्काराने हॉस्पिटल प्रशासन, कर्मचारी आणि डॉक्टर्स हे देखील समाधान व्यक्त करीत आहेत.सामाजिक बांधिलकीचे भान राखत रुग्णालय मोफत आरोग्य तपासणी शिबिरे तसेच तपासण्या राबवत असते. त्यासाठी अनेक कर्मचारी आणि डॉक्टर्स मेहनत घेत असतात. कायमच रुग्णालयात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी पॅकेज गरजू रुग्णांच्या उपयोगात यावे म्हणून असतात. सर्व प्रकारचे आरोग्य विमा रुग्णालय स्वीकारत असून रुग्णसेवा अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News