अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथील आपत्कालीन विभाग म्हणजे वेळ, अचूकता आणि कार्यक्षमता यांचे नियोजन…

Jan 10, 2021

रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये (इमर्जन्सी डिपार्टमेंट) जाण्याच्या प्रसंगाचे तसे कोणी नियोजन करत नाही, पण अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा दुखापतीमुळे तिथे जाण्याची वेळ आली तर तेथे पोचल्यानंतर काय असते हे आपल्याला माहिती असले पाहिजे. अशोका मेडिकव्हर हाॅस्पिटल्स येथील आपत्कालीन विभागामध्ये रुग्णांना तत्काळ उपचार पुरविले जातात. गंभीर आजारापासून ते अपघाताने झालेल्या दुखापतींवर तसेच अन्य कोणत्याही तातडीचे उपचार या विभागामार्फत केले जातात. रुग्णांना कमीत कमी वेळेत अचूक वैद्यकीय मदत देण्यासाठी या विभागामध्ये फिजिशियन, नर्सेस आणि अन्य आरोग्यसेवा कर्मचारी सर्व प्रकारच्या सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित मानके, प्रक्रिया आणि नियमावलीचे पालन करून काम करतात.आपत्कालीन औषधोपचार, म्हणजे अपघात आणि आपत्कालीन उपचार, हे तातडीच्या वैद्यकीय देखरेखीची गरज असलेल्या आणि गंभीर आजार व दुखापतींशी संबंधित वैद्यकीय विशेष सेवा (स्पेशॅलिटी) आहे. सर्व वयाच्या रूग्णांना कोणत्याही वेळी सक्षम पणे उपचार देण्याचे काम आपत्कालीन विभागातील फिजिशियन करतात. आरोग्य सेवा पुरविणारे पहिल्या फळीतील या वैद्यकीय तज्ज्ञांची प्राथमिक जबाबदारी ही रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा जीव वाचविणे आणि त्याची प्रकृती स्थिर करण्याची असते. त्याचबरोबरीने आजार किंवा दुखापतीमागचे कारण शोधून, योग्य ती पावले उचलून वैद्यकीय निदान करणे आणि तीव्र स्वरुपात असलेल्या या आजार किंवा दुखापतीवर उपचार करणे ही त्यांची जबाबदारी असते.आप्तकालीन फिजिशियन्स हे सामान्यतः रुग्णालयांच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणारे आणि अतिदक्षता विभागामध्ये काम करतात. अर्जंट केअर क्लिनिकसारख्या तातडीचे उपचार पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही ते काम करू शकतात वा असतात. आपत्कालीन औषधोपचारांमध्ये मेडिसिन, मेडिकल टाॅक्सिकोलाॅजी, अल्ट्रासोनोग्राफी, क्रिटिकल केअर मेडिसिन, हायपरबेरिक मेडिसिन, स्पोर्ट्स मेडिसिन, पॅलिएटीव्ह केअर किंवा एरोस्पेस मेडिसिन यांचा समावेश होतो.आपत्कालीन औषधोपचार हे प्रामुख्याने गंभीर अवस्थेतील किंवा आजाराच्या तीव्र व प्रगत टप्प्यातील रुग्ण ओळखून निदान करून केले जातात. जलद गतीने, विविध विशेष शाखांची व्यापक माहिती, वैद्यकीय ज्ञान आणि विविध तांत्रिक व वैद्यकीय कौशल्यांच्या आधारावर केले जाणारे हे औषधोपचार असतात. वेगवेगळ्या तीव्रतेच्या आणि कोणत्याही शारीरिक परिस्थितीतील सर्व वयातील रुग्णांना उपचार देण्याचे काम इमर्जन्सी फिजिशियन करत असतात. आपत्कालीन औषधोपचार क्षेत्रातील डाॅक्टरांना रक्तस्त्राव, श्वसनाचा त्रास, अचानक कोसळणे, फिट येणे, तीव्र वेदना, ह्रदयविकाराचा धक्का, स्ट्रोक, टाके घालणे, हाडाचे फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन, औषधांच्या वापरातील अतिरेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची हाताळणी, आत्महत्या रोखण्यासाठीचे परिस्थिती हाताळणी या  गोष्टींसाठी  चे निरीक्षण, निदान, प्रकृती स्थैर्य, अन्य काही प्रक्रियांसाठी माहिती असावी लागते.अशोका मेडिकव्हर हाॅस्पिटल्स येथे १६ बेड्स हे आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन विभाग हा रुग्णांसाठी लागणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. या विभागामध्ये तज्ज्ञ डाॅक्टरांची नेमणूक केली असून जे कोणत्याही वेळेला उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळू शकतात. रुग्णालयाचा आपत्कालीन कक्ष हा दररोज २४ तास कार्यरत असतो. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी असलेल्या विशेष कक्षामध्ये सर्व आवश्यक उपकरणे उपलब्ध असून रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आपत्कालीन कक्षामध्ये वेळप्रसंगी छोटी शस्त्रक्रियाही करण्याची व्यवस्था आहे. ज्या प्रकरणांमध्ये आपत्कालीन कक्षातील उपचार पुरेसे ठरत नाहीत अशा रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर संबंधित विभागातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडे पाठवून दाखल करून घेतले जाते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News