नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी; सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Jan 15, 2021

नाशिक : शासनाने ॲनलॉक जाहिर केल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून जिल्ह्यात सर्वच गोष्टी हळूहळू सुरु करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होवू नये म्हणून नागरिक व क्लासेस संचालकांच्या मागणीनुसार 15 जानेवारी पासून नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी क्लासेस सुर करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. क्लासेस चालकांनी शासनाचे सुरक्षेविषयक मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची कमी होतांना दिसत असून रुग्णसंख्या पंधराशे पेक्षा खाली आलेली आहे. जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण देखील कमी आहे. कोरोनाचा प्रादूर्भावाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात हळूहळू सर्व सुरु करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नवीन वर्षात नववी व बारावीच्या शाळा देखील सुरु करण्यात आल्या आहेत.

शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती 70 ते 80 टक्के असल्याने विद्यार्थ्यांचा देखील प्रतिसाद दिलासादायक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक पालकांची व क्लासेसच्या संचालकांची मागणीनुसार क्लासेस सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत असल्याचे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जाहिर केले आहे.

अनलॉक जाहिर झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने सगळे सुरु करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू नये,म्हणून शाळा,क्लासेस सुरु करणे हा शासनाच्या कर्तव्याचा भाग असल्याने क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News