झायडस निार्मित कोविड -19 लस फेज 3 ची चाचणी नाशिकमध्‍ये ; एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल मध्ये 25 जानेवारीपासून मिळणार विनामूल्य लस

Jan 22, 2021

नाशिक : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारत सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. झायडस निार्मित कोविड- 19 व्हॅक्सीन फेज 3 ट्रायल देण्यासाठी एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल च्या युनिट 2 ची निवड केली आहे. येत्या सोमवार 25 जानेवारीपासून ही लस विनामूल्य एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथे दिल्या जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देतांना प्रो.डॉ. राज नगरकर म्हणाले कि, या उपक्रमात कोणीही स्वेच्छेने सहभागी होऊ शकतो. नागरिक आपल्या ओळखीच्या तसेच नातेवाईकांची देखील नोंदणी करुन ही लस घेऊ शकतात.
लस कोण घेऊ शकते?
1. 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती, 2. ती व्यक्ती कर्करोगी अथवा क्रिटीकल आजार नसावे 3. त्या व्यक्तीची कोविड टेस्ट निगेटिव्ह असावी.

याबाबतच्या तपासणीची कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
झायडस लस 91% परिणामकारक असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला असून कोणतेही मोठे साईड इफेक्ट़स सध्या तरी दिसत नाही असा दावा निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. इच्छुक व्यक्तीस प्रथम हॉस्पिटलमध्ये येऊन कोविड- 19 आरटीपीसी आर व अँटीबॉडीज टेस्ट करुन घ्यावी लागेल. जर त्या टेस्ट चे रिपोर्टस निगेटिव्ह आले तरच त्या व्यक्तीची या अभ्यासासाठी नोंदणी केली जाईल.लसीचा एक डोस दोन इंजेक्शनचा असून दोन्ही खांदयांवर दिला जाणार आहे. पहिला डोस नंतर 28 दिवसांनी शेवटचा डोस 56 दिवसांनी दिला जाणार आहे. संपूर्ण लसीकरण 3 डोस घेतल्यावर पूर्ण होईल. म्हणजे लसीकरण करुन घेणा-या व्यक्तीस हॉस्पिटल मध्ये तीन वेळा यावे लागेल.सदरची चाचणी मर्यादित लोकांची करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य हे तत्व पाळले जाणार आहे व त्यासाठी ॲपॉइन्टमेन्ट घेणे आवश्यक आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News